Skip to main content

डु-आयडी थेरपी

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/03/2011 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीने कोरले जे असे चेहऱ्यावरती तसे ते ठसे नित्य मुखवटे तेच खुपावे बंध किती हे सहन करावे? नाव जसे मिळविले कर्माने निष्कलंक नी अबाध्य जपणे जपती सगळे प्राणपणाने झुकतो आत्मा ह्या ताणाने मुक्त श्वास घेण्या तापातून उपाय असती फ़ार पुरातन नाट्य, तमाशा, किंवा लेखन प्रदान करीती अलगच दर्शन कोणी जाती हास्यगृहांतरी टिंगू अथवा लंबू दिसे जरी हसूनी स्वत:ला खरे पोटभरी मुखवट्याची बोच नष्ट करी जाल जादुई बघा उभरले चेहरा पुस्तक तेथ उमटले ब्लॉग विविध आयडींने केले समाज दर्पण जणू उभरले महाजाल बघ विणले घट्ट का करिशी स्वत्वाचा हट्ट? धरी आयडी नाना कळा घेई श्वास बेबंद मोकळा संस्थळींचे जादुई दर्पण तणाव-नाशक मुक्त वर्तन दिसुही शके ना स्वत: जसे रूप दर्पणी भिन्न दिसावे
लेखनविषय:

वाचने 2427
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

खर्‍या आयडी बी विविध अंतर्प्रतिमेने वादित्/संवादित असतात आपलाच वाद आपणाशी

In reply to by प्रकाश घाटपांडे

+१

तुमचा दुसरा आयडी नक्की पाषाणभेद किंवा प्रकाश१११ किंवा गंगाधर मुटे आहे .. बरोबर की नाही ? ;)

अरुण मनोहर - छान .आवडली कविता नाव जसे मिळविले कर्माने निष्कलंक नी अबाध्य जपणे जपती सगळे प्राणपणाने झुकतो आत्मा ह्या ताणाने खूप शुभेच्छा ..!!

छान कविता! डु-आयडी थेरपी घेऊन बघावी असं वाटतंय.

डु-आयडी मंजे काय ? डु-आयडी कसा काढतात ? आपली तर बुवा जेवढे काय आयडी आहेत ति सर्व अस्सल/वरिजनल आहेत.