अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
कचर्याचे ढीग नाहीत
झोपड्यांचे दृष्य नाही
छोट्या छोट्या टपर्या नाहीत
थुंकीभरले रस्ते नाहीत
रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही
ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत
मोटरगाड्यांची रेलचेल आहे
पण ट्राफीक जॅम होत नाही
येथे थंडी गुलाबी नसते
अंगामासात कापरं भरते
जॅकेट-कोट घातले तरी
कशाकशालाच दाद देत नसते
एसी शिवाय घर नाही
कर्पेट शिवाय फ्लोअर नाही
मोकळी जागा भरपूर आहे
पण मुलांना खेळायला वाव नाही
लोकांमध्ये शिस्त आहे
थोडीबहुत नम्रताही आहे
नाहीतरी आपण परकेच आहोत
तेव्हा जुळवून घेणे भागच आहे
आपली मुले मेहनत करतात
खडतर मार्ग पारही करतात
आधुनिक जग जाणून घेतात
प्रगतीपथ आजमावून बघतात
म्हणून ज्येष्ठांनो जरूर या
अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2164
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
Sure.......
Sure.......
तिकंड शेटल व्ह्यायला किति पैका लागतो, मंजी ईचार करता येईल.
मला एकदम साबुदाना खिचडी
मला एकदम साबुदाना खिचडी खावीशी वाटतेय
=)) =)) आणि मला साबुदाणा
In reply to मला एकदम साबुदाना खिचडी by शिल्पा ब
=)) =)) आणि मला साबुदाणा वडा खावासा वाटतो आहे. बाकी कवितेवर जाणकार कवी प्रकाश१११ आणि रसिक गणेशाचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक :)
- शेंगदाणा चटणी
मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ
In reply to =)) =)) आणि मला साबुदाणा by टारझन
मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ कटींग चाय.
इडली मेंदु-वडा- पुदिना चटनी.
ओ भौ
In reply to मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ by नरेशकुमार
मेंदु-वडा खाता तुम्ही?
दुसर्याच्या मेंदुचा भुगा
In reply to ओ भौ by पैसा
दुसर्याच्या मेंदुचा भुगा करुन मग त्याचा वडा बनवुन खात असावेत?
निषेध!
In reply to दुसर्याच्या मेंदुचा भुगा by शिल्पा ब
त्यावर आमची मोनॉपली आहे.
पहायला काय
रहायला सूध्दा मस्त देश हाय त्यव असं ऐकूनै
अमेरिका हा देश कुठे
अमेरिका हा देश कुठे आहे?
अमेरिका हे काय आहे?
त्याबद्दल इतकी चर्चा का?
त्याबद्दल इतकी चर्चा
In reply to अमेरिका हा देश कुठे by भडकमकर मास्तर
त्याबद्दल इतकी चर्चा का?
मास्तर सुंदर अश्या कवितेवर अनावश्यक प्रतिसाद देणे हि तर कंपू बाजांची खासियत
तुम्ही मुंग्यांच्या वारूळावर पाय देऊ नका (स्वानुभव )
आम्ही धसमुसळा खेळ खेळणार आणी संघाबाहेर जाणार .