अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
कचर्याचे ढीग नाहीत
झोपड्यांचे दृष्य नाही
छोट्या छोट्या टपर्या नाहीत
थुंकीभरले रस्ते नाहीत
रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही
ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत
मोटरगाड्यांची रेलचेल आहे
पण ट्राफीक जॅम होत नाही
येथे थंडी गुलाबी नसते
अंगामासात कापरं भरते
जॅकेट-कोट घातले तरी
कशाकशालाच दाद देत नसते
एसी शिवाय घर नाही
कर्पेट शिवाय फ्लोअर नाही
मोकळी जागा भरपूर आहे
पण मुलांना खेळायला वाव नाही
लोकांमध्ये शिस्त आहे
थोडीबहुत नम्रताही आहे
नाहीतरी आपण परकेच आहोत
तेव्हा जुळवून घेणे भागच आहे
आपली मुले मेहनत करतात
खडतर मार्ग पारही करतात
आधुनिक जग जाणून घेतात
प्रगतीपथ आजमावून बघतात
म्हणून ज्येष्ठांनो जरूर या
अमेरिका अमेरिका
पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2143
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
Sure.......
मला एकदम साबुदाना खिचडी
=)) =)) आणि मला साबुदाणा
In reply to मला एकदम साबुदाना खिचडी by शिल्पा ब
मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ
In reply to =)) =)) आणि मला साबुदाणा by टारझन
ओ भौ
In reply to मला एक शिरा-पोहा मिक्स. विथ by नरेशकुमार
दुसर्याच्या मेंदुचा भुगा
In reply to ओ भौ by पैसा
निषेध!
In reply to दुसर्याच्या मेंदुचा भुगा by शिल्पा ब
पहायला काय
अमेरिका हा देश कुठे
त्याबद्दल इतकी चर्चा
In reply to अमेरिका हा देश कुठे by भडकमकर मास्तर