'च॒'
हिच्या॒त च, तिच्या॒त च
ह्याच्या॒त च, त्याच्या॒त च
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥१॥
च॒ळवळीत च
मोर्च्या॒त च
वच॒ननाम्यात च
प्रचा॒रात च
खुर्ची॒त च
बाचा॒बाची॒त च
राजकारण्यांशी 'च' चे बरेच सख्य दिसते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥२॥
भ्रष्टाचा॒रात च
लाच॒खोरात च
चा॒रा घोट्याळ्यात च
जकातीच्या च॒लनात च
बच॒त गटात च
ब्यांकेच्या चे॒कात च
चा॒लू खात्यात च
पैशांशीही 'च' चे खूप छान जमते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥३॥
च॒कलीत च
च॒टणीत च
चि॒वड्यात च
चा॒ट मसाल्यात च
चिं॒चेत च
चि॒कण्या सुपारीत च
जीभेच्या चो॒चल्यात च
च॒टपटीत च॒मच॒मीत सर्वांनाच आवडते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥४॥
चं॒द्र, चां॒दण्यात च
चिं॒तनात च
चि॒त्रपटात च
च॒निया चो॒ळीत च
च॒ड्डीत च
चें॒गराचें॒गरीत च
चा॒लण्यात च
चु॒कण्यात च
च्या॒ ऽऽ आईला च
रोज एकदा तरी 'च' अक्षर भेटते
'च' अक्षर देशाच्या खूप उपयोगी पडते ॥५॥
-नाहिद नालबंद
याद्या
2158
प्रतिक्रिया
11
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपाव
व्वा ! 'च' प्रमाणेच
व्वा ! Smile 'च' प्रमाणेच
In reply to व्वा ! 'च' प्रमाणेच by टारझन
खरंच खुपच चांगली कविता आहे.
चनछा
चस्तम
एक चंम्बर...
एकदम झकास.....
वेगळी मस्त कविता
गमतीदार अक्षरखेळ
चविताक चवडलीआ. चहितलि चहार.
चस्तम !!!