उंदीरमामा आणि मनीमावशी -
काव्यरस
ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंग
ऐकू आली फोनची रिंग -
कुणीच नाही फोनपाशी
उंदीरमामा बिळापाशी !
उंदीरमामा हसले मिशीत ,
टेबलावरती चढले खुषीत -
फोन लावला कानाला
जोरात लागले बोलायला -
" उंदीरमामा मी इकडे ;
कोण बोलतय हो तिकडे ? "
- विचारले मामानी झटकन
उत्तर आले की पटकन-
" मी तुमची मनीमावशी,
कालपासून आहे उपाशी ."
- मनीमावशी भलती हुषार ,
टुणकन मामा बिळात पसार !!
वाचने
3965
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
हा हा हा हा !
हाहाहा टॉम आणि जेरी लगेच डोळ्यासमोर आले...
In reply to हाहाहा टॉम आणि जेरी लगेच by पिंगू
अगदी अगदी!!
मस्तच!
मस्त!
छान आणि मस्त कविता
विदेशी घेऊन केलेली काव्यरचना :)
- स्वॉदेश
हाहाहा!!! एकदम मस्त!
.

मस्त. :)
छान आहे
बडबड गीत वाटत आहे
हा हा हा
खासच.
खुपच सुंदर
रुपाली
एकदम मस्त
हा हा हा ... मज्जा वाटली वाचून....
हा हा हा हा !