-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा---------------------------
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा
नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे
शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा
गरजले सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आहे आवाज मराठीचा
तेजोमय तलवार तळपते
येथे ललकार मराठीचा
विवेधतेतला नाद
साज मराठीचा
एक चिंगार
मराठीचा
गणेशा
काव्यरस
वाचने
1982
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक मदत हवी आहे:
भगव्या रंगाला बंदी असावी
In reply to एक मदत हवी आहे: by गणेशा
नजरेच्या तीराने ही घायाळ होतो
मस्त शब्द्च्छल....
शब्दसंख्येचा उतरता क्रम ही