Skip to main content

अजून काय...

लेखक असुर
Published on शुक्रवार, 15/10/2010
बरे झाले न्यायालयाने निकाल देऊन टाकला पुन्हा एकदा धर्मांधाना भांडायला पॉइन्ट मिळाला आता परत धर्माच्या नावाखाली कडवटपणा वाढेल आणि पुन्हा एकदा दंगली होतील नि अजून काय! महिने आणि वर्षे फार छोट्या गोष्टी झाल्यात दशकानुदशके पलीकडून फक्त गोळ्याच आल्यात दहशतवादी पुन्हा एकदा ऐन थंडीत घुसखोरी करतील आणि पुन्हा एकदा कारगिल होईल नि अजून काय! आजही अनेक फितूर सूर्याजी पिसाळ जन्माला येतायेत अतिमहत्वाच्या माहिती शत्रूला विकतायेत परत एकदा मुठभर लोक आपल्या घरात घुसून दंगा करतील आणि पुन्हा एकदा २६/११ होईल नि अजून काय! एकीकडे आयपीएल आणि सीडब्ल्यूजी साजरे होतायेत आणि हजारो कोटी रुपये पाण्यासारखे वाहतायेत दुसरीकडे दारिद्र्यरेषा अजून ठळक होत जाईल आणि पुन्हा एकदा नक्षलबाडी होईल नि अजून काय! मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय! इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो येईल या देशी पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य की आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय... (अन्यत्र पूर्वप्रकाशित)
लेखनविषय:

वाचन संख्या 1969
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

नि:शब्द! शब्द अन शब्द मनातला लिहिलायस मित्रा.

In reply to by धमाल मुलगा

अरे, या कवितेची प्रेरणा लिहायची राहूनच गेली! पुण्यात असताना माझी धमालपंतांशी या विषयावर एकदा अतिशय जोरदार चर्चा झाली होती! या कवितेची सुरुवात तिथे कुठेतरी आहे! --असुर

अजून काय.. असा विचार आपल्या देशातले बहुतेक लोक करतात हेच तुला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर असावे. :) छान लिहिलंय. :)

इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो येईल या देशी पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य की आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय... अजुन काय ? अजुन काय ?

मी म्हणतो, नकोत मला शिवाजी कि अजून कोणी जिवंत व्ह्यायला, मीच होईल भक्कम, मीच करीन माझ्या जीवनातील सैतानाचा नाश. मीच आहे विष्णू, रावणाचा नाश करणारा राम मीच, आणि मीच होईल शिवाजी. कोणी मावळे आले तर ठीक नाहीतर मीच लढा देईल एकटा. सर्व थोरामोठ्यांचा आदर्श ठेऊन त्या स्वर्गातल्या रामालासुद्धा हेवा वाटला पाहिजे असे राज्य मीच स्थापन करील. अशी शपथ का कोण घेत नाही ? बाजीप्रभू ज्या हिमतीने खिंडीत लढला त्याच्या किती पट हिम्मत लागते आज सगळ्या भ्रष्ट नेत्याशी लढा द्यायला ? कोणाच्या तरी नावाने जयघोष करायचा आणि आपल्या रोगी मनावर तात्पुरती मलम पट्टी करून झोपी जायचे. असं किती युगे चालणार ? >>आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय... नाही, क्षितिजावरून सूर्याला वर खेचून आणू. 'जिंकू किव्वा मरू' असे नाही. जिंकू आणि केवळ जिंकू.

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!
ज हा ल !! काव्य एकदम खत्तरनाक भौ.

आमचा ऋ .. ऋष्या.. ऋषिकेश हो अश्या अनेक सामाजीक कविता करायचा नियमीत. त्याची आठवण झाली. आहे कुठे तो सध्या?