अरे, या कवितेची प्रेरणा लिहायची राहूनच गेली!
पुण्यात असताना माझी धमालपंतांशी या विषयावर एकदा अतिशय जोरदार चर्चा झाली होती! या कवितेची सुरुवात तिथे कुठेतरी आहे!
--असुर
इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो
महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो
येईल या देशी पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य की
आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय...
अजुन काय ? अजुन काय ?
मी म्हणतो,
नकोत मला शिवाजी कि अजून कोणी जिवंत व्ह्यायला,
मीच होईल भक्कम, मीच करीन माझ्या जीवनातील सैतानाचा नाश. मीच आहे विष्णू, रावणाचा नाश करणारा राम मीच, आणि मीच होईल शिवाजी. कोणी मावळे आले तर ठीक नाहीतर मीच लढा देईल एकटा. सर्व थोरामोठ्यांचा आदर्श ठेऊन त्या स्वर्गातल्या रामालासुद्धा हेवा वाटला पाहिजे असे राज्य मीच स्थापन करील. अशी शपथ का कोण घेत नाही ?
बाजीप्रभू ज्या हिमतीने खिंडीत लढला त्याच्या किती पट हिम्मत लागते आज सगळ्या भ्रष्ट नेत्याशी लढा द्यायला ? कोणाच्या तरी नावाने जयघोष करायचा आणि आपल्या रोगी मनावर तात्पुरती मलम पट्टी करून झोपी जायचे. असं किती युगे चालणार ?
>>आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय...
नाही, क्षितिजावरून सूर्याला वर खेचून आणू.
'जिंकू किव्वा मरू' असे नाही. जिंकू आणि केवळ जिंकू.
मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील
सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील
पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील
परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!
_/\_
कवितेची प्रेरणा..
हम्म.. अजून काय..
इतके सगळे होताना मला नेहेमी
+१ जळजळीत सत्य. काव्य आवडले.
अतिशय छान ..
क ड क!!!! रे असुर्या...
असं किती युगे चालणार ?
केवळ अप्रतिम !!!
मस्त
मग 'नक्षलवाद संपवून टाकू' -
:-)