पिकलं पान
पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काय काम? ||१||
पिकलं पान
हिरवटपना जात नाही
केव्हा गळेल केव्हा गळेल?
झाडालाच चिकटून राही ||२||
पिकलं पान
झाडावरून गळून जाई
झाडाखाली पडून पडून
सडून जाई ||३||
पिकलं पान
झाडावरून पडून जाई
जमीनीवर पडल्या पडल्या
जुन्या दिवसांची आठवण येई ||४||
पिकलं पान
विचारी दुसर्याला
माझा खांदा तुला?
की तुझा खांदा मला? ||५||
पिकलं पान
फळाला म्हणालं
तुझं माझं
नशीबच निराळं ||६||
पिकलं पान
पिकलं फळ
यांची होते
वेगळी वेळ ||७||
पिकलं पान
पिकली केळी
यांचे महत्व वेगळेवेगळे
वेगवेगळ्या वेळी ||८||
पिकलं पान
खाली पडलं
तिला देण्यासाठी
वहीत ठेवलं ||९||
पिकलं पान
खाली पडलं
जाळी होण्यासाठी
पुस्तकात ठेवलं ||१०||
पिकल्या पान
उपयोग किती!
झाडाखालीच कुजते
त्याच झाडाला खत होण्यासाठी ||११||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०९/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1977
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कल्पनाविस्तार!
मस्त छान कविता!
धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब
असंही होताना..
लगे रहो अथांग भाय! पिकलं
In reply to असंही होताना.. by अथांग
असही होताना पाहिल आहे,
In reply to असंही होताना.. by अथांग
छान-
सुचलं की !