Skip to main content

दुरावा

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 04/08/2010 23:52 या दिवशी प्रकाशित केले.

मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा
जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा

दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ
सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा

लाटेस भेटणारा किनारा शहारा
चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा

गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा

भ्रमरासाठी नटून बसलेले फूल
मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा

एकाच खिडकीस न्याहळीत बसता
दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा

लेखनविषय:

वाचने 2452
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा

क्या कहने!!!
ही ओळ वाचता वाचता मला शुभा मुद्गलांच्या "सीखो ना नैनोंकी भाषा पिया" चा व्हिडिओ आठवला.. :)

जाता जाता,

हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूँ है?
अब तो हरवक्त यहीं बात सताती हैं हमे॥

पुकशु!!


गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा

हे खूप आवडलं. ताजीतवानी ओळ वाटली...


In reply to by राजेश घासकडवी

गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा

वा, जहबहर्‍या कल्पना. जे न देखे रवी का म्हणतात याचे उत्तम उदाहरण.


सगळ्यांचे प्रतिक्रीयेबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार