मिटून डोळे क्षणभर पाहून मग हा दुरावा
जाता-जाता क्षणभर राहून मग हा दुरावा
दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ
सांजवेळी क्षणभर भेटून मग हा दुरावा
लाटेस भेटणारा किनारा शहारा
चिंबचिंब क्षणभर भिजून मग हा दुरावा
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा
भ्रमरासाठी नटून बसलेले फूल
मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा
एकाच खिडकीस न्याहळीत बसता
दृष्टीभेट क्षणभर लाजून मग हा दूरावा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2452
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
'दूरावा' आवडला.
'दूरावा' आवडला. :)
ऋ, मस्त आहे कविता..
क्या कहने!!!
ही ओळ वाचता वाचता मला शुभा मुद्गलांच्या "सीखो ना नैनोंकी भाषा पिया" चा व्हिडिओ आठवला.. :)
जाता जाता,
हर मुलाकात का अंजाम जुदाई क्यूँ है?
अब तो हरवक्त यहीं बात सताती हैं हमे॥
पुकशु!!
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला
गाडीच्या प्रतिक्षेत थिजला फलाट
धड-धड क्षणभर खेटून मग हा दुरावा
हे खूप आवडलं. ताजीतवानी ओळ वाटली...
हेच म्हणतो
In reply to गाडीच्या प्रतिक्षेत थिजला by राजेश घासकडवी
वा, जहबहर्या कल्पना. जे न देखे रवी का म्हणतात याचे उत्तम उदाहरण.
सुंदर रचना!
In reply to हेच म्हणतो by Nile
सुंदर रचना!
वेगळेपणासाठी या दोन ओळी जास्त आवडल्या.
भ्रमरासाठी नटून बसलेले
भ्रमरासाठी नटून बसलेले फूल
मनसोक्त क्षणभर शोषून मग हा दूरावा
वा... :)
छान
छानच कविता, ऋषिकेश.
मस्त!
सहज सुंदर रचना!
सुरेख ! ! !
सुरेख ! आणि फ्रेश ! !
आवडली ! ! !
छान रे!
मस्त लिहिलंय!
सुन्दर गझल !
सुन्दर गझल !
आभार
सगळ्यांचे प्रतिक्रीयेबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल आभार
मस्त रे ..
मस्त रे .. :)
ऋ कविता आवडली रे...
ऋ कविता आवडली रे...
सुंदर
सुंदर कविता.
शेवटच्या दोन व्दीपदी फारच छान.
आवडली.
आवडली.
ये दूरियां..........
दुरावा आवडला.
ये दूरियां तड़पाती है दूरियां .................................