Skip to main content

धागा धागा अखंड दळूया

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 04/08/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले.. हे सगळे बघून आम्हालाही काव्य गुदगुल्या सुरु झाल्या धागा धागा अखंड दळूया वाईफ वाईफ मुखे म्हणूया अजाईलाचे विवाहितांचे उभे आडवे गुंफुन धागे नविनआयडी धुरंधरांचे वस्त्र फिटले केसूरंगे सर्केश्वर तो दहिकर पहिला धाग्याअंती त्यास स्मरुया आयटी वाईफ धाग्यावरती मणामणांचे जंतू टाका टाकुन काडी झाडावरती कोक घेउनी जागा राखा स्त्रीमुक्तीचा फिरवित चरखा प्रतिसादांची मजा बघूया -केसुरंगा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2184
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by दिनेश

छ्या दिनेशदादा, तुम्ही कोकवरच कसं काय समाधान मानता ब्वॉ! नाही म्हणजे लाह्याही घ्या असं! ... (पळा आता; नाहीतर दिनेशदादा देतोय एक टोला.) विडंबन आवडले.

तरी म्हटल अजुन एकाही विडंबकाला स्फुर्ती कशी मिळाली नाही. इतका सारा कच्चा माल वाया जातो की काय ;)

मजा आली. *********** जळत्या धाग्यावरती धरू या , केरोसीनची धार , अडगळा , मज्जा येते फार.

केसुरंगाशेठ, १ लंबर विडंबन.. सर्केश्वर तो दहिकर पहिला ... हा हा हा.. (वाचक)केशवसुमार

अरे आज काय हसवून मारता का रे बाबानो? सकाळपासून इतका हसलोय की आता हसणे शक्य नाही! पण विडंबन चोक्कस केसुरंगा! ;) >>>सर्केश्वर तो दहिकर पहिला.... क्या बात है!! चतुरंग

_/\_