Skip to main content

एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 16/07/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच विषयावर दोन , दोन विडंबनं येण्याचा प्रकार दोनदा घडला, मग आम्हाला काही नतद्रष्ट शंका आल्या... एका स्थळात लिहिली, वीडंबने हि दोन शंका विचारणारे, नतद्रष्ट आम्ही कोण? पहिलेच काव्य येई नावाने केसुरंगा केशवसुमार देती पुढचे विरुद्ध अंगा दावीत दोन्हि रंगा पाध्ये चतूर दोन? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? पाध्यांस प्रश्न भारी, पडतोय या क्षणासी पंचास काय बोलू, अन् काय सदस्यांशी? दळली पिठी कुणाची, जात्यात आणि कोण? शंका विचारणारे , नतद्रष्ट आम्ही कोण? एके दिनी परंतू पाध्यांस त्या कळाले कंटक जरूरी आता त्यांना जरा न भासे दोन्ही स्वतःच बडवी, बाजूंनी ढोल कोण? शंकाच ती उरेना, पाध्ये हुशार, हो नं?
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3928
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

मीटरचे गणित जुळवताना प्रस्तुत यतिचा भंग झाला आहे. (पहा :""यति की पती ? " करि मनोरंजन जो पाध्यांचे जडेल नाते मिपाशी तयांचे. इत्यादि इत्यादि) - अमेरिक्कन हिरवा "येटी".

In reply to by मुक्तसुनीत

थोड्या दुरुस्त्या केल्यामुळे जे "मीटरात घोळा झाला" (संदर्भ केशवसुमार यांची खालची कविता) ते बहुतेक सर्व "व्यवस्थिता झाला" आहे. निदान मिपाच्या शुद्धलेखनाच्या मानदंडांनुसार तरी. संपादक आता तो दंडही उगारायला लागले म्हणायचे.... :)

In reply to by राजेश घासकडवी

मानदंड शब्दावरून दंड उगारण्यावर केलेली कोटी रोचक आहे. त्यापेक्षा "मानगूट धरणे" वगैरे जास्त रोचक झाली असती. ;-)

एका स्थळात येता, विडंबने अनेक भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक कोणी विचारले ना, अपुल्या मतास सांगा समजून चालती ते आम्हीच केसुरंगा अन ऐकुनि तयांना, चेकाळती अनेक भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक कवड्यास खाज भारी, खेळे विडंबनाशी मीटरात घोळा झाला, सांगेल ते कुणाशी ? मुसु तयास टोची, मारी हळूच हाक भलता कयास करती, नतद्रष्ट काही लोक केसुस डाव त्यांचे जेव्हा इथे कळाले नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले धुरळा जरी उडाला, धाग्यावरी क्षणैक होती मुळात सगळी ती विडंबने सुरेख

In reply to by केशवसुमार

;)

In reply to by केशवसुमार

>नतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले रोचक! अजुन एक नोंद केली केली आहे. (कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. ) ------------------------------------------------- लायसेन्स आहे मग खुशाल वाट्टेल ते बोला!

In reply to by सहज

रोचक प्रतिसाद. ऑरवेलला कधीही विसरु नका सहजराव. --अवलिया

In reply to by अवलिया

सहमत कुंपणानेच शेत खाल्ले तर काय?

In reply to by सहज

(कुत्राचे शेपूट वाकडे ते वाकडेच, सदस्याच्या खवमधे धमकी, आजकाल कोणीही विडंबन करायला लागले आहे, दिवा विझायच्या आत मोठा होतो, आता नतद्रष्ट वेडे. ) प्रस्तुत परिच्छेदातल्या एका विधानाचा दुसर्‍याशी असलेला संबंध मला जोडता न आल्याने , या परिच्छेदाचे साधर्म्य नानू सरंजाम्याच्या कवितेशी जुळते असे मला वाटले ;-)

In reply to by मुक्तसुनीत

मी देतो रोज संपादकांना ढुशी ... पुढची मूळ कविता नसल्याने विडंबन करणे जमणार नाही. क्षमस्व. अदिती (सरंजामे)

In reply to by सहज

कूल सहजराव, कूल. तुमचा लिबरल विचारवंत होतोय. काय आहे या विचारवंताना माओवाद्यांची बाजू घेताना कळत नसतं की माओवाद खरंच सत्तेवर आला तर पहिला बळी त्यांचाच जाणार आहे. दुसरी एक गोष्ट अशीही आहे - माओवादी व्यवस्थेला आव्हान देत उभे राहतात, पण वेळ आली की त्याच भारतीय घटनेने केलेल्या न्यायव्यवस्थेचा आधार घेत हेबियस कॉर्पस वगैरे करत बसतात. तेव्हा हे सारं जाणून घेऊनच व्यवस्थेचा विचार करावयाचा असतो. बरोबर?

In reply to by सहज

अता सहजासहजी समजणार्‍या साध्या आणि सरळ विडंबनात कोणी वाकड्यात शिरायचे ठरवले तर त्याला आम्ही काय करणार.. शिरो बापडे.. ह्या विडंबनाच्या / प्रतिसादाच्या इतक्या वाचकातून काही लोकानांच नोंद कराण्या सारखे काही तरी दिसले हे ही रोचक!! बाकी चालू दे !! आम्ही ही नोंद करून ठेवतो.. (चो.म.चा.)केशवसुमार स्वगतःनतद्रष्ट सर्व वेडे, फटक्यामधे उडाले...केसुरंगाच्या ह्या फटक्यात काय भलती जादू आहे.. फटके पडले एकीकडे आणि वळ उठले दुसरी कडे.. रोचक!!

आता कसे करावे , बदकेच हिंस्त्र झाली, काठावरील पोरे ,गळ टाकुनि पळाली. हलवीत काव्यनांगी ,फुगवून काव्यकल्ले, घालून काव्यकाडी , खा अडगळा तु चोप.

इतके नतद्रष्ट एका ठिकाणी गोळा झालेले पाहून मन भरून आले आणि सामना चित्रपटातले हे वाक्य आठवले - मास्तर: "काय करणार? जुनी खोड. स्वतःला सुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच. नतद्रष्ट कुठला?"

In reply to by श्रावण मोडक

+२ बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वीडंबन थोडेसेच आवडले. अदिती

इडंबन आवडले. -नतद्रष्ट -Nile

शंकामूल्यांचा 'उपद्रव' कि ' उपयुक्तता' या भानगडीत न पडता विडंबनाचा आनंद घेतला. (नीर्विकार) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

In reply to by गणपा

हे पाध्ये कोण? :? (डोमकावळा) योगेशु. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.