हल्ली जालावर वावरताना असं लक्षात येतं की गजलांचा आणि शायरांचा सुकाळ झालाय! अरे काय असतात एकेक गजला! आजच एक 'गजल' मला चावली आणि मग कळवळलोच....
केवढे चावणे हे गजल दरगजल...
काय जाणे कुणी मारली ही मजल!
मी कितीदातरी नाडि ओढायचो
अन तुमानीमधे व्हायचे मग बदल
काय दुर्भिक्ष हे कल्पना आटल्या...
का अशी देत आहेस घंटी डबल?
जाम हैराण मी जाहलो याइथे
जो उठे तो म्हणे मी नवाबे गझल
फासतो आज कोणी ... उद्या वेगळा
का 'मनोगत' विकल 'मायबोली' विकल?
आज सैलावल्यासारखे वाटते
पापडांच्यामधे एक चपटी तरल
मेंढरासारखी मेंबरे कावली
हाण तू, हाण तू, हाण 'रंगा' बुकल
चतुरंग
काव्यरस
वाचने
2492
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
और ये लगा सिक्सर
ज ब र द स्त!!
हा हा हा..
असेच म्हणतो...!
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
विडंबन आवडले
असेच
In reply to विडंबन आवडले by बेसनलाडू
झकास!
गजल दरगजल
दे दणा दण
गुर्जी
झकास