मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बेघर

बेसनलाडू · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं या पावसातही तुझ्या आठवणींना लपेटून घेतलं मी कवितेत. हळूच दुडले काही दिवस एकमेकांसोबतचे शाकारली स्वप्नांची कौलं नि पडलो जरासा वाचत मजेत नव्या छपराखाली त्याची वाट बघत चवदार शब्दांचे घुटके घेत पण वाचता वाचता डोळा लागताच हा कोसळून गेला धबाधबा माझी फिरकी घेत. जाग येऊन बेघर झालो पुन्हा नि फुटक्या कौलांचा तो ढीग घेतला पुन्हा कवेत. आता आधी कौलं घालू की वाचन संपवू इतकाच प्रश्न आहे. पुन्हा बेघर व्हायची भीती वाटते ना!

वाचने 3811 वाचनखूण प्रतिक्रिया 22

विसोबा खेचर 13/03/2010 - 14:51
आता आधी कौलं घालू की वाचन संपवू इतकाच प्रश्न आहे.
साक्षात कुसुमाग्रजही कौतुक करतील अशी कविता..! खूप आवडली.. जियो...! तात्या.

In reply to by चतुरंग

प्रभो 13/03/2010 - 21:01
असेच म्हणतो. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

मदनबाण 13/03/2010 - 19:41
वा. मस्त... :) मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

प्राजु 13/03/2010 - 22:33
बेला.. सुरेख कविता! जाग येऊन बेघर झालो पुन्हा नि फुटक्या कौलांचा तो ढीग घेतला पुन्हा कवेत. क्लास!! - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

रेवती 13/03/2010 - 23:45
कविता आवडली रे बेला! दरवर्षी नव्या पुस्तकांना घातलेल्या कव्हरसारखं या पावसातही तुझ्या आठवणींना लपेटून घेतलं मी कवितेत. हे छानच! रेवती

आशिष सुर्वे 13/03/2010 - 23:53
आपली कविता अगदी बेसनाच्या लाडवासारखीच.. ग्वाड आणि पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावीशी वाटणारी!! ====================== कोकणी फणस Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

राघव 14/03/2010 - 14:33
काही कविता अशा असतात की ज्यांना प्रतिसाद दिल्यावाचून राहवत नाही! आणिक काय लिहू? ब्येष्टेष्ट! राघव

jaypal 14/03/2010 - 17:18
आवडले ;-) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुवर्णमयी 16/03/2010 - 21:16
मुक्तछंद अतिशय प्रभावी (माझ्या कविता मात्र गद्याकडे झुकू लागल्या आहेत..)