माताय! असला लॉलीपॉप हाफवॉली मिळाल्यावर काय करावं बरं म्या पामरानं? ;)
वेळी अवेळी, कविता भाळी
परज लेखणी नवी नव्हाळी
ओळ ढोबळी, सूर पाघळी
तळमळणार्या 'जालो'माळी
पिसे कवीला, वेड जनाला
झुळझुळ कोरा, कागद ओला
कोण मेंबरा, उगा हासला
तीट लावतो काव्या मेला
शब्दढोकळा सहस्र माळा
वाचक मेळा, रोज आगळा
बर्याच वेळा, त्याचत्या कळा
दंग लेखणी, शब्द पांगळा
गारठलेली, जनता ल्याली
पुन्हा विडंबन, भर्जरि शाली
ग्लेनफिडिचची मैफ़ल सजली
'पूनम'वरच्या, भव्य महाली
अस्सल बेणे, रंग उधळणे,
ढासू गाणे, चिकन तोडणे
'चतुरंगाचे' शब्द गुंफ़णे
कविते, हे तर तुझेच देणे..!
चतुरंग
(खुद के साथ बातां : आम्हाला 'कविता कसली अढळ वस्तरा, साफ दुहेरी कल्ले कटले!' ह्या ओळींची प्रकर्षाने आठवण झाली! ;) )
काव्यरस
वाचने
3425
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्ध्या
असेच म्हणतो
In reply to अर्ध्या by शेखर
अशक्य
+१
In reply to अशक्य by प्राजु
ग्लेनफिडि
बाय द वे,
In reply to ग्लेनफिडि by विसोबा खेचर
बोका...
ढासू गाणे
In reply to बोका... by बिपिन कार्यकर्ते
शब्दढोकळा
बहुत बढिया !
लय भार्री !!
लॉलीपॉप
आपुनको आताइच नहीं!
जबरी !! धन्य
दंडवत!!!