![broken image]()
 |
|
नीज आली, पेंगलेले नेत्र झाकी श्रीहरी
सानुलीशी झाकलेली मूठ चाखी श्रीहरी
या मुठीतुन काय झरते अमृताची धार रे?
गीत सृजनाचे तुझे हे कोवळे हुंकार रे
रुणुझुणू या घाग-यांचा नाद रोखी श्रीहरी
गोड अंगाई तुला ही रातराणी ऐकवी
मंद हिंदोळ्यात बाळा चंद्र हलके जोजवी
अजुनि तुझिया लोचनी का जाग बाकी श्रीहरी?
ओठ इवले मुडपुनी का रुससि लटके तान्हुल्या?
खुदुखुदू हससी क्षणातच, चांदण्या जणु सांडल्या!
साद देती का तुला रे स्वप्नपाखी श्रीहरी?
[प्रेरणास्त्रोत असणारं चित्र जालावरून साभार.]
|
प्रतिक्रिया
छान गीत
मस्तच आहे.
In reply to छान गीत by मेघवेडा
गोड
हाय क्लास
आक्षी
सुंदर