*********************************
हवी कशाला रित पुराणी
हवे कुणाला प्रश्न नवे...
जुनेच अपुले घाव बरे..,
अन वर्तमानाचे सुत्र हवे...!
हवे कशाला क्षितिज सारे,
हवी कुणाला धरा नवी..,
तुजपुरती मज चाकोरी बरी,
अन तुला जाणीव हवी ...!
हवे कशाला पाश जुने...
हवे कुणाला स्वप्न सवे,
याद तुझी तरीही उरी..,
वळुन पाहण्या कारण नवे...!
हवे कशाला स्वर्ग साती...
जगण्या कुणाला निमित्त हवे,
एक तुझी ती मिठी खरी..,
सय तुझी अन उरात हवी..!
******************************
विशाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1226
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली जाणीव-
हवी कशाला