मागच्या ३१ डिसेंबरला
गहिवरला होतास तू....
शेवटचा पेग संपवताना
डोळा मारून म्हणाला होतास तू ,
हा पेग आता शेवटचाच बरं का...!
मागच्या ३१ डिसेंबरला
कुजबुजला होतास तू
डोळ्यात तिच्या पाहून
कानात माझ्या बोलला होतास तू ,
आता पुढच्या वर्षी दुसरी बरं का...!
मागच्या ३१ डिसेंबरला
संकल्प केला होतास तू
आता मिपावर येणे बंद
'खव'त माझ्या टपकला होतास तू ,
दुसरं संस्थळ शोधणार बरं का...!
३१ डिसेंबर परत आलाय
मधुशाला विसरलास तू
वपु घेवून बसलाहेस
’ती’ ही बहुदा बदलली आहेस तू.,
मिपाचं व्यसन मात्र तसंच बरंका. :-)
नववर्षाच्या सर्व मिसळपावकरांना हार्दिक शुभेच्छा !
विशाल कुलकर्णी.
नववर्षाच्या सर्व मिसळपावकरांना हार्दिक शुभेच्छा !
विशाल कुलकर्णी.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1260
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणीही
आरे बाणा