कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना? तिला काय कमी मोप हायेत!!;)
कसं काय एडिटर बरं हाय का, अहो बरं हाय का ?
काल काय ऐकलं, ते खरं हाय का ?
अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, 'खोबार'वाले तुम्ही
न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, 'चाल'वाले तुम्ही
सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ?
काल म्हनं तुम्ही 'खफ'ला गेला, तमाशा बघून भडकून आला
खरं काय हो एडिटर ?
प्रतिसादा ठायी, हिणकस काही, होतं काय लिवल ते खोडलंय का ?
काल म्हनं तुम्ही 'आवाहन' केलं, खरडीतलं धाग्यांत डकवून दिलं
आरंरं
केली मारामारी, कालच्या पारी, आज काय लिवायच ठरलंय का ?
काल म्हनं तुम्ही मालकांकड गेला, अन् बघता बघता राजिनामा दिला
आगं बया बया
काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, तंगड्यात शेपुट घातलंय का ?
-केसुरंगा
काव्यरस
वाचने
3153
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!!
हाहाहाहा
ही हा हा हा ...
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
लय भारी शाहिर....
ख ल्ला स !!!
फक्कड सुडंबन
अरेच्च्या...
पटका
हुच्च!!
_/\_
हम्म! बरंच
येक नंबर
झणझणीत...