Skip to main content

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

बोलीभाषा: समज आणि आक्षेप

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/11/2019 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्ते प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्याा लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्याला मा‍हीत नसतं.

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 01/11/2019 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533

समस्त लोकप्रतिनिधींनो

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 01/11/2019 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

जुनसर

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 01/11/2019 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
मॉल संस्कृती व ऑनलाईन शॉपिंगच्या झगमगाटापुढे टिकण्यासाठी बऱ्याच दुकानांना कात टाकावी लागली.

शोध (अंतिम भाग)

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी शुक्रवार, 01/11/2019 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
विनित ने कंप्लेंट केल्यानंतर त्याची केस मी वरिष्ठांना सांगून माझ्याकडेच घेतली. आता मला त्या आय पी ॲड्रेस चा शोध लावायचा होता. ते आय पी ॲड्रेस आत्ता तरी ॲक्टीव्ह दाखवत नव्हते. मी सिस्टीम वरून सर्च केलं तर त्यांचं लोकेशन मुंबईपासून खूप लांब एका घनदाट जंगलात दाखवत होतं. असेलही त्यांची एखादी गुप्त जागा किंवा एखादं घर. न जाणो ते आय पी ॲड्रेस आता अस्तित्वात असतील की नाही. या केसचं सारं काम मी घरूनच करत होतो. विनितला मी स्वतः सांगितलं होतं. केस सोडविली की मी स्वतःहून भेटेन तोपर्यंत लॅपटॉप वापरू नको असंही सांगितलं.

कर्नाटका आणि महाराष्ट्रः सहोदर संस्कृती

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी गुरुवार, 31/10/2019 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी| मिसळपाव मध्ये हा माझा प्रथम लेखन आहे| नवंबरचा महिना म्हण्जे, कर्नाटका आणी भारत देशाचा बहुतेक दा़क्षिणात्य राज्यांचा स्थापना सोहळा आहे| तसेच महाराष्ट्राचा दक्षिणेत असणारा कर्नाटकवासियांना सुद्दा राज्योत्सवाचा समय आहे | कर्नाटका हा प्रदेशाचा उल्लेख पहिलच बार महाभारत काव्याचे भीष्म्पर्वात मिळतात| 'कर्नाटका' हा संस्कृत नावाचा मूळ शब्द 'कन्नडा' आहे| कन्नडा भाषेचा उपलब्द प्रथम लक्षण ग्रंथ 'कविराजमार्ग' मध्ये, कन्नडा हा शब्दाला इथल्या भाषा आणि भूप्रदेशाचा नाव असा वापर्ला गेला आहे| हेच ग्रंथात, कार्नाटकाचा सीमा कावेरी तून गोदावरी पर्यंत होता असा उल्लेख आहे| कन्नडा भाषा संबंधी काही

शेवटचा पुरावा!

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 31/10/2019 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
"आपूनने बोला ना एक बार..... आपूनको नै पता." "तेच तर विचारतोय मी. क्या नही पता?" "यही की खून कैसे हुआ!" "कैसे हुआ?" "अब्बे घोंचू, जो नही पता वो कैसे बताएगा आपून?" एकदम टपोरी स्टाईल मध्ये उत्तर आले आणि केदारनी कमरेचा बेल्टच काढला. सटाकंsss! सटाकंsss! "अबे तेरी.....कितना जोरसे मारता है बे!" "बोल.... का केलास खून? कसा केलास?" "आपून बोला ना..... आपूनने नै कियेलाए मर्डर! नै कियेलाए!" शेकाटलेलं बूड चोळत तो भिंतीला चिकटून उभा राहिला. "अच्छा?

बनाबाई..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 31/10/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
बनाबाई आमच्याकडे कधीपासून काम करते ते कोणीच नक्की सांगू शकणार नाही. मी तान्हा असताना माझे तेलपाणी तिनेच केले आहे. आणि त्याही आधीपासून ती आमच्याकडे आहे. म्हणजे साधारण पस्तीस-छत्तीस वर्ष झाले असतील. बनाबाई आज ऐंशीच्या पुढेमागे असेल. पाठीच्या कण्याला नैसर्गिक बाक आला आहे. हालचाली मंदावल्या आहे. पण अजूनही आमच्यासकट गल्लीतल्या ८-१० घरात काम करते. तिला कुठे-कुठे काम करते हे विचारल्यावर ती सांगेल, "दोन गुजरात्याचे घर हायेत, एक मारवाड्याचं हाय..मंग डॉक्टरींन बाईच्या घरी जातो. अन समोर जोशी बाईचं घर हाय तिथं पन जातो.." इतक्या वर्षात ह्या प्रत्येक घरात कितीतरी बदल घडलेत.

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 31/10/2019 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.