Skip to main content

बुरहानपूर आणि महेश्वर - २ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 04/11/2019 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस तिसरा - ०१ जून सकाळी सगळे आवरून आणि सामान गाडीत टाकून आम्ही निघालो. आजचा पहिला थांबा होता ‘दर्गाह-ए-हकिमी’. दाऊदी बोहरा संत ‘अब्दुल कादीर हकीमुद्दीन’ यांना ज्या ठिकाणी दफन केले गेले ती ही जागा आहे. जगभरातून दाऊदी बोहरा समाजाचे लोक या दर्ग्याला भेट द्यायला येतात. इथे मागितलेली प्रत्येक मन्नत पूर्ण होते असा या लोकांचा विश्वास आहे. विस्तीर्ण आकारात पसरलेल्या या जागेत एक मोठी बाग आहे, भक्तांच्या निवासासाठीच्या, जेवणासाठीच्या इमारतीही आहेत. एकूणची जागेची स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे. मुख्य दर्गा संपूर्ण संगमरवरात बनवलेला आहे. मुख्य दर्ग्याचा घुमट पाहून ताजमहालची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक

लेखक गणेशा यांनी सोमवार, 04/11/2019 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
India Deserves Better - ९. पत्रकारांवर आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हेरगिरी आणि पाळत, सरकार आणि नागरिक थोडक्यात प्रार्श्वभुमी: व्हाट्सअ‍ॅप च्या सहाय्याने दुनियेतील जवळजवळ १४०० लोकांची हेरगिरी करण्यात आली त्यात भारतातील काही लोक(पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर) आहेत.

हस्तर कविता :- महायुती

लेखक हस्तर यांनी सोमवार, 04/11/2019 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
हस्तर कविता :- महायुती महायुती करून काय फायदा झाला ? जर सरकार एकत्र स्थापन करायचे नव्हते तर निवडणूक का आले एकत्र लढ्याला ? एक दुसऱ्याचा जागा अडवायला ? युती नावाचा प्रकार केलाच का ? एक दुसऱ्याची मते लाटायला ? मजा येत होती ५ वर्षे भांडायला अफझलखान म्हणून एक दुसऱ्याचे उणे दुणे काढायला का आनंद झाला जनादेश झुगारायला संगीत खुर्ची खेळ खेळून मनोरंजन करायला शेतकरी लागले आसू ढाळायला आणि तुम्ही बस आपले आपले शपत विधी करायला
काव्यरस

' भाज्यांचं संमेलन '

लेखक mukund sarnaik यांनी सोमवार, 04/11/2019 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
' भाज्यांचं संमेलन ' एकदा भाज्यांच संमेलन भरवलं प्रत्येकाचे महत्त्व सांगायचे ठरवल हिरवेगार घोसावळ आले पुढे म्हणाले भजी करुन खा बरे.कांदा आला हसत हसत माझ्या शिवाय तुम्हाला नाही करमत.मी जोडीला आलो बटाटा दोघांचा मिळुन बनवा चटकदार बटाटेवडा. काटेरी वांग्याचा रंगच न्यारा ताजी ताजी घेऊन भरीत भाजी करा.मी गोल लाल गरगरीत भोपळा शेजारी उभा आहे दुध्या भोपळा आणि खरं सांगु का ?

अभी न जाओ छोडकर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी सोमवार, 04/11/2019 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी जाग आल्या आल्या पुन्हा तिने फेसबुक, व्हॉट्सअप चालू केलं. फेसबुकवर त्याचं नाव शोधलं पण ते दिसत नव्हतं म्हणजे अजूनही ब्लॉक लिस्ट मधेच आहे मी. तिने विचार केला आणि हसली मनात. काही मोठा इश्यू किंवा मोठं भांडण नव्हतं झालं. तरीपण त्याने तिला ब्लॉक केलं होतं. खुप रागवला होता तिच्यावर कारण पण तसंच होतं तिने मेसेज केला नव्हता त्याला. आता मेसेज नाही केला म्हणून इतकं काय रागवायचं? इतकंच कारण होतं. पण त्याचा रागच असा होता. तिने त्याला खुपदा समजून सांगितलं की मोबाईल बिघडला होता. वरून पडून त्याचा डिस्प्ले गेला होता. खुप समजावून सांगितलं. मोबाईल नीट करून आणलेलं बीलही दाखवलं. त्याला पटलंच नाही.

क्रोएशियाची राजधानी झाग्रेब !!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 04/11/2019 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी लवकर उठल्यावर आधी कपड्यांची अवस्था पाहिली.तसे बऱ्यापैकी वाळलेले होते. एखाद-दुसरा दमट असलेला मी ड्रायर ने वाळवून घेतला. बॅगा भरल्या. घर व्यवस्थित आवरून घेतलं. भांडीकुंडी जागच्या जागी ठेवून दिली. नाश्त्याचा डबा घेतला. आम्ही बरोबर यादी सकाळी सात वाजताची टॅक्सी बोलावली. सव्वासात ला टॅक्सी आली आणि ऍना पण आली. तिला बाय करून आम्ही निघालो.,बस स्टेशनला पोहोचलो पण आमची बस अजून लागायची होती. थोड्याच वेळात ती लागली. आम्ही आपले समोरची सीट पकडून बसलो. समोरच्या मोठ्या खिडकीतून सगळे छान दिसत होतं. प्रवास कंटाळवाणा होणार नव्हता. अर्थात युरोपात ती शक्यता कमीच असते म्हणा. प्रवास अगदी रम्य असतो.

दिवाळी सेलिब्रेशन !!!

लेखक मालविका यांनी रविवार, 03/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सेलिब्रेशन !!! साधारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मी भाऊबीजेला दादाकडे गेले होते. दादा, माझ्या चुलत बहिणीला आणि तिच्या दोन मुलांना पण घेऊन आला. बरेच दिवसांनी घरात खूप जण जमलो होतो. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एक एक भाऊ येत होता ओवाळणी होत होती, गोडाधोडाचं जेवण जेवून भेटीगाठी होऊन तृप्त होत होतो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माहित नाही, आज जेवण बाहेरून मागावूया म्हणून ठरलं. आता दादाच घर हे मुंबई गोवा हायवेला जरी असल तरी आहे ते खेडेगावचं. शहरात झोमॅटो नि स्वीगी वरून ऑर्डर करतात तसं काही शक्य नाही. गावात जरा बरं असं हॉटेलदेखील नाही.

ब्लॉक (Block)

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी रविवार, 03/11/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
Block किती छोटा शब्द आहे. अडीच अक्षरी आणि इंग्रजीत चार अक्षरी पण, या छोट्याशा शब्दाने संवादच संपून जातो. काही काळापुरता नाहीतर कायमचा. किती सोपं झालंय आजकाल आपल्याला नकोसं असणारं कोणी ब्लॉक मध्ये टाकलं जातं नाहीतर आपण कोणाला नकोसे झालो तर आपल्याला ब्लॉक केलं जातं. खुप प्रसिद्ध झाला आहे शब्द हा. नाही आवडलं कर ब्लॉक नाही पटलं, राग आला, नकोसं झाली कोणी कर ब्लॉक. ते पण एक टच वर. फक्त एक टच आणि झालं समोरचं माणूस ब्लॉक. संवाद तिथंच संपला. त्या व्यक्तीला काय वाटेल मन दुखावलं जाईल याचा विचार पण येत नाही.