Skip to main content

ठाकठोक

बिपीन सुरेश सांगळे यांनी या दिवशी प्रकाशित केले.
ठाकठोक --------- मी तसा ओके आहे . फक्त एक गोष्ट सोडता . मला जास्त आवाज आवडत नाही . सहनच होत नाही. पण वरच्या मजल्यावरची ती जीवघेणी ठाकठोक ! ती बाई हे सारं मुद्दाम करते . मला त्रास द्यायला. छळायला. यावर काहीतरी उपाय काढायलाच हवा; नाहीतर मी मरून जाईन असं वाटतं. आज मला बरं वाटतंय. शांत शांत . वेगळंच .कारण वरचा आवाज बंद झालाय. पण पोलीस आले आणि त्यांनी मला धरलं . “का खून केलास तिचा ?” एका पोलिसाने विचारलं. मला काहीच आठवत नव्हतं. सांगणार तरी काय? एका कामवालीने मध्येच तोंड घातलं ,” साहेब, ती बाईसुद्धा वेडसर होती. तिला सारखा पालींचा भास व्हायचा . नसलेल्या पालींच्या मागे ती घरभर फिरायची. त्यांना मारत - ठोकत !”