मी
डिसेंबर पासून एका कंपनीचे काम External Consultant म्हणून करणं सुरू आहे. त्यांची २० मार्चपासून लॉकडाउनमुळं घरून काम करण्याची सूचना मिळाली. त्यांच्या ऑफिसात जायचो तेव्हा विशेष काही काम नसायचं.आता घरून काम करताना मात्र कितीतरी कसली-कसली कामं देताहेत. अर्थात, त्यातली कोणती करायची आणि कोणती टाळायची याचं गणित ज्याचं त्याला माहित असतंच!
पूर्णवेळ नोकरी सोडून पाचेक वर्षे झाली तेव्हापासून वर्षातून आठेक महिने काम करतोय. एप्रिल-मे महिन्यात शक्यतो काम करण्याचं टाळतो, ते उद्दिष्ट आता (घरून काम करत असल्याने) एका अर्थाने पूर्ण होत आहे. सध्याची वर्क-ऑर्डर सप्टेंबर पर्यंतची आहे.