Skip to main content

भगवंत....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 26/02/2021 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
भगवंत..!! भुकेल्यास देई अन्न, दुर्बलास धीर, आंधळ्याची काठी होई, तोच खरा थोर... दीनजन सेवेसाठी, झिजवी "तो" शरीर, याचकासि कर्ण होई, तोच खरा थोर... तान्हुल्यास क्षीर देई, तृषार्तास नीर, कुणा द्रौपदीस चीर देई, तोच खरा थोर... अनाथांची होई माय, शत्रुपुढे वीर, पतितांना उद्धरुन नेई, तोच खरा थोर... कुणी म्हणती गुरु त्याला, कुणी म्हणे संत, सर्वांतरी तोच आहे, माझा भगवंत.....!!! जयगंधा.. २४-२-२०२१.
काव्यरस

सय...

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 25/02/2021 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुणचार बरेचदा औपचारिकता,आपली संस्कृती आहे.पण आपल्याच माणसांकडे खेळीमेळीचा पाहुणचार न राहता ती होती आपुलकीची सय..मऊ,कोमल. आत्याच्या गावी निवांत जायचे..

सध्या मी काय पाहतोय ? भाग २

लेखक मदनबाण यांनी बुधवार, 24/02/2021 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच मोदींनी हिंदुस्थानात निर्माण केलेला आणि जगात अव्वल दर्जाचा असलेला अर्जुन एमके- १ ए हा लढाऊ रणगाडा लष्कराला सुपूर्द केला. ११८ अर्जुन एमके- १ ए रणगाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव देखील आता क्लिअर झाला आहे.

ट्राईब्स ऑफ युरोपा : नेटफ्लिक्स

लेखक साहना यांनी बुधवार, 24/02/2021 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
गेम ऑफ थ्रोन्स, वॉकिंग डेड इत्यादींच्या अभूतपूर्व यशानंतर अनेकांनी ह्या प्रकारचा मसाला टाकून विविध सिरीस निर्माण केल्या. १०० काय, बेडलँड्स काय, एक्सपांस अनेक ठराविक साच्यातील साय फाय किंवा फँटसी सिरीयल ची चलती आहे. एक वेगळे विश्व् निर्माण करायचे म्हणजे २३०० तील पृथ्वी किंवा दुसरा ग्रह वगैरे. मग त्यांत विविध टोळ्या, राजघराणी वगैरे असतात. ह्यांचात दुश्मनी असते. प्रत्येक टोळीचा जो प्रमुख नेता असतो तो मग काही तरी अवघड निर्णय घेतो, सत्तेसाठी षडयंत्रे, अनेक बरी वाईट पात्रें, भरपूर हिंसा आणि त्याला विनाकारण लावलेला शृंगाराचा तडका.

चंदन सा बदन

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 24/02/2021 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी सरळ नाकासमोर पहात चालणारा सज्जन कुटूंबवत्सल भोळा वगैरे गृहस्थ आहे. इकडेतिकडे बघणं नाही आँखे किसीसे ना उलझ जाये मै डर ता हूँ, यारो हसिनोंके गली से मै गुजरता हूँ !! morning walk साठी beach वर गेलो. फूटपाथ च्या टर्निंग वर दिसली, शेजारणीशी काही बोलत होती. सहजच माझी नजर समोर गेली, सकाळची कोवळी किरणं चेह-यावर पडून नितळ कांती complexion glow होत होती. कालच केलेल्या eye-brows चे धनूष्य ताणले होते. इंदीवर लिहीतात, " ये काम-कमान भवे तेरी" काहीतरी लिहीतात, मी म्हणालो होतो, आज 40 वर्षांनी म्हणतोय बरोबर लिहीलयं ! सुखवस्तूपणामूळे double chin. आता ती बोलतांना हसू लागली, बहूदा न बघताही कोण

झांझरीया उसकी छनक गयी,मेरी नजर उससे मिली तो...

लेखक बाजीगर यांनी बुधवार, 24/02/2021 02:41 या दिवशी प्रकाशित केले.
ही मुंबई नवा airport होण्याआधीची आठवण आहे. मी hand-baggage screening करण्याच्या रांगेत उभा होतो.....रांग पुढे सरकत होती, सहज माझी नजर समोर आपली पर्स व बॅग्ज screening belt वर ठेवणा-या स्री वर पडली. आणि तिचे assets पाहून जरा खिळली, त्याचवेळी बॅग belt वर ठेवून तिने वर पाहिले, आणि दूर्दैवाने माझी 'चोरी' पकडी गई, मी चटकन दुसरी कडे पाहीले, पण कबख्त नजर पुन्हा ना चाहते हूवे तिकडे वळली, आता ती स्वत:चे कपडे चटकन check करत होती, सर्व ठिक असल्याची खात्री पटल्यावर,तिला मी काय पहातोय हे कळलं. खरं तर आता तिनं पुढे व्हायला हवं होतं पण ती तिथचं रेगाळली, रांगेत और लोक पण होते पण दूर्दैवाने जरा उंच व लक्ष

हे घे ते घे

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 23/02/2021 09:01 या दिवशी प्रकाशित केले.
हे घे, ते घे हे घे,ते घे हे जमव, ते जमव. अरे लागेल कधी तरी म्हणत, घरात मोठ्ठं भांडार वसव. भिंतीवर घड्याळे, हँगिंग्ज, चित्रे, लटकलेली आहेत जागोजागी. तरीही आणखी म्युरल्स हवीत, जुनी फोटोफ्रेमही थोडी जागा मागी. इंच नि इंच जागा लढवतो तरी आम्ही नवीन वस्तू खरीदतो. सागर किनारीचे शंख शिंपले, डोंगरमाथ्यावरचे दगडधोंडे, संमेलनातली असंख्य पुस्तके, मासिके-वर्तमानपत्रातील कात्रणे, हवीत यंत्र, तंत्र, विद्युत उपकरणे, हवीत देखभाली साठी मग अवजारे. त्यांच्या पावत्या, गॅरंटी, वॉरंटी ताप डोक्याला, हव्यात कशाला इतक्या कटकटी?

१ अप ४ डाऊन

लेखक मालविका यांनी सोमवार, 22/02/2021 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
२००,३०० किमी BRM झाल्यावर पुढच्या स्पर्धेचा किडा वळवळला. आमच्या वेळापत्रकात बसेल अशी स्पर्धा शोध चालू होता. सगळे पर्याय विचारात घेता १९ फेब्रुवारीला औरंगाबादला असणारी ६०० किमीच्या BRM ची निवड झाली. बरोबर स्वप्नील दाभोळकरआणि तेजानंद होतेच. अचानक ३ दिवस आधी रोशनची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली.आता आम्ही एकूण ५ जण झालो. आताशा BRM ला ग्रुप ने जायचं कि बोलेरोमध्ये सायकल टाकायच्या आणि बाकीच्यांनी कारने जायचं हे जवळपास समीकरण ठरूनच गेलाय. ३०० नंतर ४०० न करता डायरेक्ट ६०० ची झेप घेणं आव्हानात्मक होत. पण प्रयत्न करून बघू, आपल्याला जमेल असा विश्वास होता.

वेळासबद्द्ल माहिती हवी आहे.

लेखक सॅनफ्लॉवर्स यांनी सोमवार, 22/02/2021 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी बर्याच दिवसांपासुन (खर तर वर्षांपासुन ) वेळास कासव महोत्सव बघण्यासाठी जायचा विचार करतोय पण दरवेळेस काही कारणाने नाही जाता आलं. मागच्याच महिन्यात आम्ही कार घेतली तेव्हा ठरवल कि यावर्षी नक्कि जायच. मी मिपावर यासंबंधित लेख शोधले पण मला नाही सापडले. तरी कुणाला काही माहिती असल्यास सांगणे. आम्ही २ कपल जाणार आहोत. १. तारखा. २. शनी-रवि जावे कि इतर दिवशी जेणेकरुन महोत्सव निट बघता येइल. ३. राहण्यासाठी घरगुती सोय असल्यास व त्यांचा मोबाईल क्र मिळाल्यास उत्तम. ४. पिंपळे गुरव पुणे येथुन जाणार आहे त्याप्रमाणे रूट.

घर..

लेखक आजी यांनी सोमवार, 22/02/2021 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वडील डॉक्टर होते. सरकारी नोकरी होती. त्यांच्या दर दोन,तीन वर्षांनी बदल्या होत. प्रत्येक गावात राहायला सरकारी क्वार्टर्स असत. त्यामुळं वेगवेगळ्या खूप घरांतून राहायचा मला अनुभव मिळाला. घरे मोठी,ऐसपैस. वडील रिटायर झाले. तेव्हा मी पाचवीत होते. मी माझ्या आईवडिलांना उशीरा झालेली मुलगी आहे. माझ्या भावंडांच्यात आणि माझ्यात वयाचं खूपच अंतर आहे. वडील रिटायर झाल्यावर आम्ही भाड्याच्या घरातही राहिलो. मग लगेचच आम्ही थोडंसं गावाबाहेर स्वतःचं घर बांधलं. ते घर चौदा हजारांत बांधून झालं. त्यावेळी मी सहावीत शिकत होते. त्या घरात आम्ही राहायला आलो.