Skip to main content

पानसेबाई

लेखक संदीप चित्रे यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच 'चेंगट' किंवा 'शुंभ' म्हणाल्या नाहीयेत !” पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !! कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखऱ्या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं ! आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही.

विठू सांगे...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

गुरु- एक मार्गदर्षक

लेखक राधा यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज गुरुपौर्णिमा........... तेव्हा प्रथम माझ्या गुरुंना आणि श्रध्दा स्थनांना मी नमन करते. प्रत्येक झण आपल्या जिवनात कोणाला तरी आदर्श मानुन पुढे चालत असतो. कोणी देवाला, कोणी गुरुला, कोणी एखद्या महान व्यक्तिला तर कोणि स्वतालाच. पण जीवनात सगळ्यांनाच मार्गदर्शनाची गरज असतेच. माझे आई-वडिलच माझे खरे गुरु आहेत . ज्यांनी मला या जगात 'जगण ' शिकवला.

मिपाकरांच्या माहितीकरता...

लेखक आणिबाणीचा शासनकर्ता यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांच्या माहितीकरता - मिपावरील सध्याच्या कार्यकारी मंडळात काही बदल केले आहेत. काही नावे कमी केली आहेत तर काही नव्याने घातली आहेत. सध्या या कार्यकारी मंडळातील मंडळी खालीलप्रमाणे आहेत. चतुरंग, केशवसुमार, धोंडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ दिलिप बिरुटे प्रियाली विसोबा खेचर. मिपावर टाकल्या जाणार्‍या लेखांमध्ये व प्रतिसादांमध्ये गरज वाटल्यास योग्य ते बदल करण्याचा, किंवा वेळप्रसंगी ते संपूर्ण लेखनच काढून टाकण्याचा या मंडळींना पूर्ण अधिकार आहे.

तर हे अस आहे आभासी जग तुमच...!!!!

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : स्नेहश्रीताईंची सुंदर कविता तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!! खरा कुणाचा कोणाला पत्ता नाही कोण कुठे हे माहीत नाही आज या नावे तर उद्या त्या नावे लाईन लागते प्रतिसाद मिळेल तिथे नसते वाद घेतो मी ओढून प्रतिसाद नाहीत जातो मी सोडून कोणाची कोणाला पडलेली नसते अभासी जगात हे असेच असते खोटा राग खोटी माया आणि त्यातच जातय आयुष्य वाया खोटे निषेध , वाहवा खोटे यावर झडतात वाद मोठे कोणाला नाही चिंता श्रधास्थानांची अजिबात नाही पर्वा थोरांमोठ्यांची ================= कंदीलसुमार -----------१८-०७-२००८

"उघड्यावरची' कारवाई

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
थेट मंत्रालयातून आलेलं फर्मान बघून वरिष्ठ आरोग्य अधिकारी मानकामे हडबडलेच. एकतर नुकतीच दुपारच्या भरपेट जेवणानंतर त्यांना डुलकी लागत होती. चहा प्यायला कॅंटीनमध्ये जायला अजून वेळ होता. टेबलावरचा फायलींचा ढिगारा थोडासा बाजूला सारून त्यांनी मस्त निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. बाकी, सरस्वतीशी लहानपणापासून कधीच जमलं नसलं, तरी सरकारी कार्यालयात चिकटल्यापासून निद्रादेवीशी मानकाम्यांनी चांगलंच जुळवून घेतलं होतं. मागल्या दारानं चोरपावलांनी लक्ष्मीही अधूनमधून पाणी भरत होती. जनू जमदाडे शिपायानं आणलेल्या अर्जंट टपालामुळे मानकामे जाम वैतागले. ""काय आहे?

"सहवास"

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या रखरखीत वाळवंटात एक ओऍसिस...... तुझा सहवास तु आहेस चराचरामधे तु आहेस कणाकणामधे ता-यांतून पाहतो आहेस वा-यातून जाणतो आहेस पृथ्वीवर आहे तुझीच छाया माझ्यातल्या 'मी' मधे सुध्धा... तुच आहेस अनंत काळाचा सोबती... अजुनही चालतोच आहे वादळे उठली..... शांतही झाली कितींची संगत सुटली किती नाती तुटली कोसळणा-या विश्वासाला सावरत चालताना.... झाकोळलेल्या काळोख्या रात्री वाट शोधताना... सोबत आहे माझ्या एक अश्वासक दिलासा.... तुझा सहवास...... फक्त तुझा सहवास

वात्रटिका

लेखक शेखर यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"मिसळपाव" खाता खाता लागली जोराची हागवण ! शौचकुप शोधायला इतिहासात धावले भक्तगण !! ================ शेखर - १८-०६-२००८
Taxonomy upgrade extras

तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!!

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 18/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कुणाचा कोणाला पत्ता नाही कोण कुठे हे माहित नाही आज इथे तर उद्या तिथे लाईन लागते पैसा मिळेल तिथे बोनस देत नाही टाकतो मी पेपर इंक्रिमेंट नाही घ्या माझे लेटर कोणाची कोणाला पडलेली नसते कॉरपोरेट जगात हे असेच आसते खोट रडणं नी खोट हसणं आणि त्यातच आपल आयुष्य शोधणं खोटी सहानभुती , मदत खोटी यावर चालते आपली रोजीरोटी कोणाला नाही चिंता आजुबाजुच्याची अजिबात नाही पर्वा माणुसकीची.