Skip to main content

पावसाची परी

Published on शुक्रवार, 15/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
कुठे लपलीस सरी दु:खी पावसाची परी सरी बसल्या लपून परी गाल फुगवून ये ग सरी ये ग सरी गाते पावसाची परी सरी आल्या भरभरून परी हसली खळखळून नको सरीवर सरी चिंब पावसाची परी बुडे घरे दारे सारी परी जा ग तुही घरी
लेखनविषय:

याद्या 1914
Taxonomy upgrade extras

नाव शोधून शोधून जोडू नको!

Published on शुक्रवार, 15/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8| एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले!
लेखनविषय:

याद्या 3330

(कहर)

Published on शुक्रवार, 15/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;) टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला आडलो नाही तसा मी बोलताना आडला येऊन हुद्दा ऐरणीला काय सांगू कहर हा झाला कशाने का पुढे बसवून गेली ढापणीला? ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? ते भले मोठे नको रोखूस डोळे संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे मार खाण्याची अखेरी वळचणीला चतुरंग
लेखनविषय:

याद्या 3657

अजुन काही फोटोज... :)

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्य
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 5307

वैराग्यभावनेचा अभाव.. भारताच्या लोकसंख्या प्रश्नाचे मूळ?

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
(मागे मुमुक्षू यांनी राष्ट्रभावनेचा अभाव.. भारतासमोरच्या अडचणींचे मूळ? हा विचार चर्चेत आणला. त्यांच्या कळकळीला दाद देत मी वेगळी विचारसरणी सांगितली की राष्ट्रभावनेच्या भाव-अभावाबद्दल कोणाला दोष न देताही अडचणींबद्दल कारवाई केली जाऊ शकते. माझा व्यक्तिगत अपवाद मानून [सर्व प्रतिसादकारांस त्याबद्दल धन्यवाद] अनेक प्रतिसादकारांनी या विचारसरणीला भ्रष्टाचाराची भलावणी मानली, आणि रसातळाकडे जाणार्‍या समाजाची नांदी मानली. म्हणून त्या लेखात आणि प्रतिसादातल्या युक्तिवादासारखा दुसरा एक युक्तिवाद मी येथे देत आहे.

याद्या 20580

एक हट्टी "देशप्रेमी'

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
...तरीही "भारतकुमार' विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा कपाटातल्या "ओम शांती ओम'च्या सीडीपाशी गेला. सीडी काढून त्यानं खिशात टाकली अन्‌ थेट न्यायालयाचा रस्ता धरला. विक्रमादित्य चालत असताना सीडीतून शाहरुख नावाचा वेताळ बाहेर आला. ""काय रे मिळतं तुला बॉलिवूडच्या बादशहाला त्रास देऊन? प्रसिद्धी?'' वेताळानं विचारलं. विक्रमानं चेहऱ्यावरचा हात हलकेसे बाजूला केला. वेताळ आणखी कावला. म्हणाला, ""बरं, असो. एक गोष्ट ऐक! आटपाट नगराचा एक राजा होता. तो काही राजघराण्यात जन्मला नव्हता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1687

डॉ दाढे यांचे अभिनन्दन

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
आपले मित्र मिपासदस्य डॉ दाढे यांचे अभिनन्दन त्यानी गेल्या आठवड्यात एक विक्रमही केला. दंत चिकेत्सेत शल्यविषारद असलेल्या डोक्टरानी एका दिवसात आठ मायनर आणि एक मेजर केस केली! त्या आठवड्यात एकूण तीन मेजर झाल्या! डोक्टर साहेब तुमच्या ज्ञानाने लोकांचे आयुष्य सुखी होते. आपले अभिनन्दन
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7386

सहावा वेतन आयोग लागू; २००६ पासूनचा फरक मिळणार

Published on गुरुवार, 14/08/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
नवी दिल्ली - सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला असून जानेवारी २००६ पासून या आयोगाच्या शिफारशी लागू होणार आहेत. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरासरी २१ टक्के वेतनवाढ मिळणार असून जानेवारी २००६ पासूनचा वेतनातील फरकही देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची अंमलबजावणी येत्या सप्टेंबर महिन्यापासून होणार असून वेतनातील फरकाची रक्कम दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम चालू आर्थिक वर्षात तर उर्वरित ६० टक्के रक्कम २००९-१० या आर्थिक वर्षात देण्यात येईल.

याद्या 6968