Skip to main content

(........आकाशाशी जडले नाते !!)

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 23/05/2008 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
(........आकाशाशी जडले नाते !!) प्रभुश्रीराम, गदिमा, सुधीर फडके यांची माफी मागुन हे विडंबन-- ----------------------------------------------------------------------------- आकाशाशी जडले नाते, जेट एअरवेजचे ! टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! गोयंकाने सहज उचलिले वीर इंडियन्सचे ! पुर्ण जाहले मॅनेजमेंटच्या हेतु अंतरीचे ! कमी जाहले प्रवास भाडे, जो तो झेपावे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! मुग्ध प्रवासी सहज न्याहळी जेट पंखधारी ! नयनांमाजी एकवटुनिया धावपट्टी सारी ! उडू लागले विमान हळू हळू, जो तो आनंदे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! हात जोडुनी म्हणे सुंदरी प्रवास-जनतेशी ! "आज सेवा अर्पियली मी अपुल्या चरणाशी" ! आनंदाने मिटले डोळे तृप्त जनतेने !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! झुकले थोडे विमान, प्रवासी घाली सुरपट्टा ! वैमानीकही सुचना देती साथी-दारांना ! त्यांच्या कानी गजर पोचले, विमान लँडीगचे !!टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !! असंख्य झाल्या विमानसेवा, असंख्य उड्डाने ! एटीसी( ATC ) ते सिग्नल देती कंट्रोल जीवनाचे ! आकाशाशी जडले नाते ऐसे दुनीयेचे !!! टेकओव्हर झाले डेक्कनचे टेकओव्हर झाले डेक्कनचे !!
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3119
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया