Skip to main content

प॑कज चव्हाण

लेखक पंकज चव्हाण यांनी शुक्रवार, 23/05/2008 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बोलायच खुप असत मला पण बोलणं मात्र जमत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुखवल जात आम्हाला दुखवता आम्हाला येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही खोट खोट हसता हसता रडता मात्र येत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही दुःखात सुख अस समजता दुःख ही फिरकत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही बरोबर बरेच असतात पण एकटेपणा काही सोडत नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही चार शब्द सांगतो पण कोणी ऐकतच नाही. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही ज्यांना आम्ही मित्र मानतो मित्र ते आम्हाला समजतच नाहीत. काय सांगु माझ्या बद्दल मलाच काही कळत नाही मांडायचा प्रयत्न करतोय पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत. लाभले आम्हास भाग्य बॊलतो मराठी जाहलो ख्ररेच धन्य ऐकतॊ मराठी धर्म, पंथ, जात एक मानतॊ मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगरगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1962
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे. आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे. भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे, वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे. गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या, रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे. कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे. सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी