तांडव..
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार
नित्य होती वार जैसे घुमे तलवार..
वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार
कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार
जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार
कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार
'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार
कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार
युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार
जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार
रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार
मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार
जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार
मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार..
- प्राजु
लेखनविषय:
याद्या
3281
रशियाचा धडा
मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले.
याद्या
3506
" एकद्दाच्यं कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू
"शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड" अशी एक म्हण आहे.मांसाहाऱ्यांसाठी प्राण्याना कुठ्ल्या दिव्यातून जावं लागतं ह्याचा जरा कानोसा घेतला.आणि मग ठरवलं,
" एकद्दाच्य कायथे होन ज्यावूद्दये " -इती, पिंग-पॉन्ग-चू
दिलीप प्रभावळकर.
याद्या
4089
स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...
मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली.
स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास
केला सत्यानास| भामट्यांनी
अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे.
आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत.
लेखनविषय:
याद्या
3961
Taxonomy upgrade extras
स्वातंत्र्य तर मिळाले, पण...??
स्वातंत्र्य तर मिळाले
इंग्रज तर पळाले,
पण...
दहशतवाद जन्मला ...तो येथेच आहे.
भ्रष्टाचार जन्मला ... तो येथेच आहे.
स्वातंत्र्य तर मिळाले,
स्वराज्य तर मिळाले,
पण...
महागाई वाढली .. ती जात नाही
बेरोजगारी वाढली ..ती जात नाही
स्वातंत्र्य तर मिळाले,
लोकशाही तर मिळाली,
पण...
लोकसंख्या वाढली ... ती वाढतेच आहे
बेईमानी वाढली .. ती वाढतेच आहे.
स्वातंत्र्य तर मिळाले
इंग्रज तर पळाले,
पण...
इंग्रजी येथेच आहे ... ती जाणार नाही
गरीबी येथेच आहे ...ती जाणार नाही
लेखनविषय:
याद्या
1421
Taxonomy upgrade extras
मनातला पाऊस
विरह व्याकुळ तप्त धरेवर
मुक्त बरसले श्यामल जलधर
ओलेती मग त्रुप्त धरा ती
ल्याली शालू हिरवा सु॑दर
हिरव्या रानी दिसती दूरवर
शुभ्र रुपेरि रेषा धुसर
खडका॑ना हो फुटला पान्हा
स्वैर उधळले धुधाळ निर्झर
उद॑ड पाणी पिऊन नाले
तुड॑ब भरुनी ओढे झाले
क॑पित कातर वायु लहरी
तर॑ग ऊठले शा॑त जलावर
क्रुषीवला॑ची शेतामध्ये
लगबग झाली घेऊन ना॑गर
पिके कोवळी हिरवे खाचर
त्रुप्ती सारया॑ मनामना॑वर
माळावरती रानफुला॑ची
जमली नक्षी र॑गीत सु॑दर
फुलपाखरे इकडून तिकडॅ
ऊडू लागली द्रुश्य मनोहर
त्रुप्त जाहली स्रुष्टी सारी
तुष्ट जाहले जलचर भुचर
रानामध्ये कुठे ला॑बवर
घुमु लागले पाव्याचे सुर
लेखनविषय:
याद्या
1456
दगडूचे अभिनंदन!
पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते.
नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते.
अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे.
याद्या
7302
मिसळपाव