Skip to main content

खव्वयांसाठी पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापुर, चिपळुण, रत्नागिरी आणि हैदराबाद मधिल हॉटेलांची यादी [त्यातल्या त्यात सामिश भोजन]

लेखक संताजी धनाजी यांनी शनिवार, 22/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही घ्या हॉटेलांची यादी. ज्या लेखावरुन यादी बनवली तो येथे आहे. तुम्ही प्रतिक्रिया देवुन यादिमध्ये वाढ करु शकता. पुणे १. सुगरण्स कोल्हापुरी - पुणे-३० झक्कास कोल्हापुरी थाळी मिळण्याचे ठिकाण. मटण्/चिकन सोबत तांबडा पांढरा रस्सा, दहीकांदा, भाकरी एकदम टकाटक चव Smile पत्ता: सदाशिवपेठेत, भरत नाट्य मंदीरावरुन टिळक रस्त्यावर टिळक स्मारक मंदीराकडे येताना लागणार्‍या शेडगेवाडीत हे सुगरण्स कोल्हापुरी आहे. २.

संक्रांतीच्या शुभेच्छा

लेखक नंदन यांनी शनिवार, 22/11/2008 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
१. अर्थातच ही कविता पूर्णपणे काल्पनिक आहे. २. कुणालाही आक्षेपार्ह वाटल्यास उडवून लावली तरी चालेल. अल्फा असो वा याहू!
Taxonomy upgrade extras

बिनडोकपणे रस्ता तोडला (BRT)

लेखक टवाळचिखलू यांनी शनिवार, 22/11/2008 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
बी आर टी म्हणजे बस रॅपीड ट्रान्झीट असे पुणे पालिकेला वाटते पण माझ्या मते हे बी आर टी म्हणजे बिनडोकपणे रस्ता तोडला असेच आहे. मी रोज हडपसर ते नळस्टोप असा प्रवास करतो(दुचाकीने). पण कधी कधी बस ने जाण्याचा योग येतो (म्हणजे मी आणतो ) तेव्हा लक्षात येते की या बी आर टी प्रयोगाला मान्यता देणारा खरंच अभियंता होता काय ? असेल तर कुठल्या शाखेचा ? विचार करण्यासारखे काही मुद्दे असे . १. बस स्टोप रस्त्याच्या मध्यभागी आहे म्हणजे प्रत्येक प्रवाशाला रस्ता ओलांडणे भाग पडते (प्रवास सुरु करताना आणि संपल्यावर). २.

खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 22/11/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ होती.नदी खळाळत वहात होती.वीजा चमकत होत्या.राजा-राणी पल्याड जायला आतूर होती. पल्याडला त्या वटवृक्षाखाली त्यांच घरकूल होतं.आत्तांच परत येऊ अशा समजूतीने ती दोघं मुलाना एकटच सोडून नदीच्या अल्याड आली होती.
Taxonomy upgrade extras

चौपाटी !

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 22/11/2008 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : आपली सगळ्यांची लाडकी , चौपाटी ! मुक्तराव : या सुनितराव ! काय म्हणताय ? हवा पाणी काय म्हणते ? सुनितराव : हीक्क् च्छॉ ! कसली हो हवा ! कधी वारं झणाण्तंय , कधी जीवघेणा उकाडा.. सर्दी होऊन राह्यली आहे केव्हाची. मु. : (स्वगत) हा सुनितराव सुद्धा एकदम कंडम माणूस आहे. कुणी "कसे चालले आहे" असे विचारल्यावर "खरोखरच" कसे चालले आहे हे कुणी सांगते काय ?! नि काय तो आवाज शिंकताना ! जाऊ द्या. (प्रकट) मग ? काय हालहवाल आपल्या चौपाटीवर ? सु. : ठीकच चालले आहे म्हणायचं ! जो तो आपल्या आपल्या "ह्याच्यात" ! तो आपला "हा" ... भारी पेटलाय त्याच्या नेहमीच्या "ह्या" विषयावर ! मु. : खराय !

शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/11/2008 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
शाक्त पंथीय साधक साधिकांची शक्ति उपासना नरमुंड धारी, कालिके,स्यय:म उर्जा स्त्रोत,तु शक्ति असे. आम्हि वामाचारी,शाक्त पंथीय, माते, तुज आमुचे वंदन असे. हे नाग नंदिनि,कालिके,चंद्र सुर्य ,तुझे अलंकार असे जरी वाटे भयभित तुजे रुप,त्यातच आम्हा ममता दिसे योनितत्व प्राशुनि,साधक साधिका अराधनेस माते सज्ज असे हे मातंगी,भुवनेश्वरी,महालक्ष्मी,आम्हि स्वेछ्याचारी तुझे दास असे "म"कार साधक आम्हि,मद्य,मास,मुद्रा,मत्स्य,मैथुन,चे उपासक आहे, तव प्राप्तिसाठी बगलामुखी देवि,घट्कंचुकी विधी अनुष्टीत आहे उघडले उघडले द्वार,ईडा,पिंगलेचे,तव उर्जा आत शिरली आहे माते धन्य धन्य हा साधक, मा कुंडलीनि जागृक झाली आहे. लागली बघ

अकल्पित..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 21/11/2008 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
"सुमना, निघतो गं." रावसाहेबांनी सुमनाला म्हणजे त्यांच्या सुनबाईला हाक मारून सांगितलं. "हो बाबा या. आणि हो, संध्याकाळी दाजी काका येणार आहेत तेव्हा ओफिसधून लवकर या. मी, सुशांतलाही सांगितलं आहे. तो ही संध्याकाळची त्याची डिप्लॉयमेंट उद्या करतो आहे. मी ही आज स्टुडीओतून लवकरच येणार आहे." सुमनाने, स्वतः चा डबा बॅगमध्ये ठेवत ठेवत सांगितलं. "पण आज तू उशिरा निघाली आहेस का? कारण ८.३० वाजले गं" .. रावसाहेबानी विचारलं. " हो.. आज ९.३० वाजता जाणार आहे मी. आज डेमो आहे क्लायंटला माझ्या डिझाईनचा. त्यामुळे डायरेक्ट तिकडेच जाईन. बर, तुम्ही निघा.. मी ही आता अंघोळ वगैरे आटोपून घेते." असे म्हणत सुमना आत वळली.

सुके मटण - आता छायाचित्रांसह

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 21/11/2008 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ललिता यांच्या 'सुके मटण' या पा.कृ. ला आमच्या फोटूंचा साज चढवत आहे (अर्थात परवानगी घेउन!). मुळ पा.कृ. ला प्रतिक्रिया देतांना अनेक मिपाकरांनी फोटू न टाकल्याची खंत व्यक्त केली होती. ती आता दुर होइल अशी अपेक्षा. मुळ पा.कृ. - माझे छोटे बदल - फोटू सुचना: ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं. >> आम्ही मात्र त्याच दिवशी खाल्लं तरि मस्त लागलं!!

कर्णधारांची दैनंदिनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 21/11/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मि.प. करांना धाडसी गुप्तहेराचा नमस्कार. पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया , फ़क्त मि.पा. सभासदांसाठि. बिशन सिंग बेदी :- ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले.

डोरियन ग्रे

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 21/11/2008 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
डोरियन ग्रे "बिग बॉस मधून एकाचे पलायन" कॅमेराच्या झगझगाटात प्रश्नांची सरबत्त्ती.. सेलेब्रिटी उभी आपल्याच धुंदीत तिथेच आशाळभूतपणे उभी असणारी झिपर्‍या केसाची, पोट खपाटीला गेलेली मुले .. कुणालाच दिसली नाहीत? नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा आणि बघण्याचा हट्ट वाढतोच आहे... एक कॅमेराचा झोत गेला की मागे उरलेल्या अंधारात अनेक जण सामावतात.... अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात निवडक काहींना कधी कळणार? कधी कळणार आम्हालाही? की ..
Taxonomy upgrade extras