Skip to main content

शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका.

लेखक सुभाष यांनी गुरुवार, 05/03/2009 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिवाजी महाराजांची "लुटी" मागची भुमिका. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संवर्धनासाठी,स्वराज्य बळकट बनविण्यासाठी बर्याच वेळा शत्रूच्या प्रदेशामध्ये लुटी केल्या.या लुटी त्यांच्या वैयक्तिक चैनीसाठी,विलासामध्ये जिवन घालविण्यासाठी नव्हत्या, त्या फक्त स्वराज्य बळकट करण्यासाठीच होत्या.या लूटीच्यावेळीहि कांही नियम,पथ्ये कटाक्षाने पाळली जात असत.कोणाच्याहि मनाला येईल,मर्जी होईल तशी लुट करण्याची कोणालाहि परवानगी नव्हती.याबाबतीत महाराज फार दक्ष असत.लूटींच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे नां याकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे.या नियमांचे उल्लंघन करणार्याला ते कडक शिक्षा फर्मावित असत.ही सर्व लुट राज्याच्या

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

बेगम बर्वे - एक डोक्यावरून गेलेले नाटक

लेखक मनिष यांनी बुधवार, 04/03/2009 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच (१ मार्च) सतिश आळेकरांचे प्रचंड गाजलेले 'बेगम बर्वे' नाटक मूळ संचात (स्वतः आळेकर, चंद्रकांत काळे, मोहन आगाशे वगैरे) पहायचा योग आला. नाटकाची खूप किर्ती ऐकली होती, त्यामुळे अगदी उत्सुकतेने ते नाटक पाहिले, पण फारसे झेपले नाही! :( खूप प्रश्न पडलेत -- इथे मिपावर जाणकार माहिती देतील अशी आशा आहे. हे नाटक प्रामु़ख्याने स्त्री भुमिका करणार्‍या, बालगंधर्वांना आदर्श मानणार्‍या पुरुष कलावंताची शोकांतिका आहे. पण मग काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीच. नलावडे बाई म्हणजेच बर्वे - हे कसे काय? पुढे तिचे/त्याचे लग्न, एकत्र राहणे ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आहे का? शिवाय ते दिवस राहणे??

लोकसभा निवडणुक २००९: दक्षिण भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी बुधवार, 04/03/2009 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडणुक-२००९ च्या माझ्या अंदाजात आता वळू या दक्षिण भारताकडे. दक्षिण भारतात कर्नाटक (२८ जागा), लक्षद्विप(१ जागा), केरळ (२० जागा), तामिळनाडू (३९ जागा), पाँडेचेरी (१ जागा) आणि आंध्र प्रदेश (४२ जागा) अशा १३१ जागा आहेत.

मनाच्या कुपितले-मुलाखत

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 04/03/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या कुपीतले या सदरातला हा दहावा लेख
मुलाखत - केदार कुलकर्णी
तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या 'झी गौरव' समारंभात 'गंध' या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली.

इब्लीस चाचा आणि इतर काही गोष्टी.

लेखक रामदास यांनी बुधवार, 04/03/2009 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारची सकाळ.चाचा आरामात पेपर पहात बसले होते. चाची आली .चाचांना म्हणाली , "काय हो पेपर बरे वाचताय सकाळी" "दुसरा काय ऑप्शन आहे गं आपल्याला.चाळीतली माणसं आपण .सकाळी दरवाजा खुल्ला ठेवावा लागतो ना. " चाचा चाचीकडे डोळ्यात इश्क आणून म्हणाले. चाची खमकी ."पेपर बघताय निस्ते ,चष्मा बरा लागत नाही " चाचानी एक मोठ्ठा दर्दभरा सुस्कारा सोडला. "आजकाल पेपरात बघण्यासारखंच असतंय ग.आणि तू मिड डे बंद केल्यापासून ....."चाचानी आणखी एक सुस्कारा सोडला. "अहो काही लाज , शरम ,कुलकी मर्यादा काही आहे की नाही ..किती म्हणून पेपर बंद करायचे, आधी तो चावट पारशी करंजीया आणि त्याचं ब्लिट्झ.

<<ती>>

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 04/03/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक अबक दुबक अबक दुबक अबक दुबक करीत ती निघाली...... स्वतःशीच हसत पर्सच्या बन्दाशी उगाचच चाळा करत...... रस्त्यातून जाणारांचे श्वास अद्धर राहिले.

संस्कृती आणी आपण

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 04/03/2009 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृतीआणी संस्कार.. सुखी संसारचा आणी आयुष्याचा पाया. हा पाया भक्कम असला कि कोणत्याही बिकट परिस्थितीवर व संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले गुण माणसाच्या अंगी आपोआपच जोपासले जातात. आता ही संस्कृतीआणी संस्कार म्हणजे तरी काय? माझ्या मते आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवावरुन अथवा त्यांना अवगत असलेल्या विद्येवरुन "हे करणे योग्य" आणी "हे करणे अयोग्य" असे जे सांगून ठेवले आहे अशा सर्व गोष्टींचे संकलन म्हणजे संस्कृती होय. आजकाल बरेच जणं आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत असे ठासुन सांगतात.

मश्रूम-फ्लॉवर फ्राय

लेखक जृंभणश्वान यांनी बुधवार, 04/03/2009 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ०) पाव किलो मश्रूम (शक्यतो पांढरे, काळपट नकोत) १) पाव ते अर्ध्या किलोच्या दरम्यान फ्लॉवर २) एक मध्यम आकाराचा कांदा ३) ४-५ मोठ्ठे चमचे तेल, शक्यतो जेवढा जिन्नस आहे त्याच्या अंदाजानुसार ४) तिखट, मीठ, हळद, आणि हिंग पावडर अंदाजे ५) भरपूर लाल मिरचीच्या बिया - पिझ्झावर घालायला मिळतात तशा ६) गरम मसाला/भाजीचा विकतचा मसाला/आले लसूण पेस्ट - हे सर्व ऐच्छिक, नाही वापरले तरी चांगला लागेल पदार्थ कापाकापी: प) मश्रूम आणि फ्लॉवर उभट कापून ठेवा. फ) कांदा - आपले बोट न कापता जेवढा बारीक कापता येइल तेवढा बारीक कापा कृती: प्र

(रांधण्याची शिकवणी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 04/03/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा मागल्यासारखंच! हे रामदास काही उ(हु)च्च लिहून जातात आणि आमचा धर्म आम्हाला सोडवत नाही हो! त्यांची 'गाण्याची शिकवणी' वाचली आणी आमच्या वेगळ्याच शिकवणीचे तास डोळ्यांसमोर येऊन गेले!