Skip to main content

मी कुठवर पाहू वाट ?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठवर पाहू वाट ? मी कुठवर पाहू वाट ? सांग ना..... कुठवर पाहू वाट ? या उत्तररात्री आठवतो मज केशसंभार घनदाट ही रिती शेज अन् तळमळता मी जाते उशीत भिजून पहाट सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? तो तरुण कोवळा स्वप्नाळू ती सुंदर , शीतल ना कुठला थाट पाहताच तिला तो हरवून गेला ....नयनी आठवांची* ही लाट ! * आठवांची = आठवणींची सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? ते भावविश्व नाजुक त्याचे ती परखड , वास्तव , अभ्यासू पुसताच तिला त्याने तेंव्हा मारली तिनेच त्यावर काट ! सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? आला इथवर तो, संसारी पण विसर न पडला खास नांदीस जिंदगीच्या तेंव्हा लागला भैरवीचा जो नाट ! सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? हे घरकुल सारे भरलेले पण साक्षीस ना भार्या आता मज नसे वासना कशाचीच पण्.....समोर भरले ताट ! सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? केली न कधीही प्रतारणा पण कांता न च झाली प्रेयसी जरी प्रेयसी न झाली कांता, मनीचा सरला न अंतर्पाट ! सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? हे उंच उंच जाती गगनी पहिल्या प्रेमाचे का झोके? त्या प्रेमाचे जुने खोड हे, सखये.....पुन्हा एकदा छाट ! म्हणुनी पाहतो तुझी मी वाट ! सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ?
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1262
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

ते भावविश्व नाजुक त्याचे ती परखड , वास्तव , अभ्यासू पुसताच तिला त्याने तेंव्हा मारली तिनेच त्यावर काट एवढा नाजूकपणा?

सगळ्या ठिकाणी वाट पहाणेच! कल्पना छान आहे. [कविताही] :) क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com