खेळ जुने-नवे
पुर्वीचे खेळ म्हणजे पकडा-पकडी, लपाछूपी, डबाइसपैस, विठी दाडू, गोट्या, आंधळी कोशिंबीर, डोंगराला आग लागली, तळ्यात मळ्यात, संत्र लिंबू, आम्ही तुमच्या पाण्यात, रंग रंग कोणता रंग, म्हातारी म्हातारी, पायता पायता, आट्यापट्या, रुमाल उडवी, पतंग उडविणे, चाक फिरविणे (गाडा) आबादबी, खांबापकडी, आणि असे बरेचसे खेळ होते. ह्या खेळांमधून मुलांचे मनोरंजन तर होतच होते शिवाय त्यांचा व्यायामही होत होता.
तसेच काही खेळ होते जसे कवड्या उडविणे, अटक्-मटक, भोवरा फिरवीणे, चिठ्ठी चिठ्ठी, भातुकली ह्या खेळातुन मुलांचे निखळ, निरागस मनोरंजन होत होते.
"माय"
कधीमधी उगाचच वाटत राहतं,
आपणही आभाळ व्हायला हवं होतं..
मायच्या फाटक्या नशीबावर,
फाटकं का होईना..
पांघरुण व्हायला हवं होतं.
पापणी होऊन अलगद,
तिच्या आसवांना झेलायला हवं होतं..
तिच्या आयुष्यातल्या अंधारावर,
चांदणी होवुन का होईना ..
भरपुर पाझरायला हवं होतं.
तिच्या सुरकुतलेल्या चेहर्यावर,
जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं..
राहुन राहुन मन खंतावतंय,
एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन..
मनसोक्त रडायला हवं होतं.
विशाल.
माझं काय चुकलं...?
आठवतं अजुनही ....
आपलं ते...
कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं.
तुझं पुन्हा पुन्हा,
मान वळवून बघणं...
आणि उधारीवर घेतलेल्या...
सिगारेटच्या धुरात,
माझं डोळ्यातलं पाणी दडवणं.
तु विचारलं होतस
का रे?
"आनंदी आनंद गडे!"
आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत.
"आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच"
असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला,
"हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे."
हे ऐकून मी म्हणालो,
"बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं म
नारायणगावचा थरार!!!
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.
परब्रह्म
परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी
वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी
संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी
ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी
देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी
सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी
तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी
निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी
दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी
नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी
संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी
आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी
क्रिप्टीकप्रतिपालक
दुपारी १ वाजता फोन खणाणला. मास्तरांचा होता. खरी तर ही मास्तरांची वामकुक्षीची नाहितर शेतसारा वसुल करायची वेळ, फोन उचलला तर पलीकडे काकू.
"हे कसे तरी करत आहेत रे परा" काकू.
आमचा अंदाज खरा ठरला म्हणायचे,मिपावरच्या एका लेखातील प्रतिसाद वाचुन असे काहीतरी होणार ह्याची खात्री होतीच.
एकंदरीत माहीती अशी मिळाली.
मास्तर प्रत्येक वाक्यात 'सर्वप्रथम' हा शब्द वापरत होते. त्यातल्यात्यात सर्वप्रथम शब्दानेच वाक्याची सुरुवात करायला बघत होते.
दर २ मिनिटानी छोटा डॉन चा उद्धार करत होते. ( हे आवडले)
मास्तरच्या फोन बुक मधे दोनच मिपाकरांचे फोन होते. १. परा २.
मिसळपाव