Skip to main content

"माय"

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 03/06/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
कधीमधी उगाचच वाटत राहतं, आपणही आभाळ व्हायला हवं होतं.. मायच्या फाटक्या नशीबावर, फाटकं का होईना.. पांघरुण व्हायला हवं होतं. पापणी होऊन अलगद, तिच्या आसवांना झेलायला हवं होतं.. तिच्या आयुष्यातल्या अंधारावर, चांदणी होवुन का होईना .. भरपुर पाझरायला हवं होतं. तिच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर, जाईच्या हातांनी गोंजारायला हवं होतं.. राहुन राहुन मन खंतावतंय, एकदा का होईना तिच्या कुशीत शिरुन.. मनसोक्त रडायला हवं होतं. विशाल.
लेखनविषय:

वाचने 2070
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कल्जि घेने

केवढं हृदयस्पर्शी लिहिता तुम्ही. काय प्रतिक्रिया द्यावी? फक्तं एवढच म्हणतो की ज्यांच्यासाठी वेळ गेली नाहिये, त्यांनी नक्कीच शिकावे या कवितेतून. सुंदर कविता!! -अनामिक

भिडली कविता ह्रदयाला. सुंदर!

बहुगुणींशी सहमत.

फारच सुंदर... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

शब्द नाहीत खरच! कविता काळजाला भिडणे यालाच म्हणत असावेत! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा