Skip to main content

सौभाग्य

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या गजर्‍यास काय ठाउक केसांत माळलेल्या कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले... सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले हृदयात आसवांचे मग सूर लागलेले... जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने? होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले... मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो होमात आज माझे आयुष्य पेटलेले... चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...
Taxonomy upgrade extras

शिवसेनेचा निलाजरेपणा

लेखक टायगर यांनी शुक्रवार, 05/06/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तेसाठी माणसाने किंवा एखाद्या पक्षाने महत्त्वाकांक्षा ठेवणे गैर नाही. परंतु त्यासाठी लोलुप होऊन काहीही विधाने करणे, हे गैरवाजवी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सोलापुरातील वक्तव्य आहे. अण्णा हजारे यांच्या खूनाची सुपारी देणाऱ्यास फाशी देण्याची मागणी त्यांनी केले आहे. तसेच सध्याच्या सरकारने हे काम केले नाही, तर युती सत्तेत आल्यास सुपारी देणाऱ्यास फाशी देण्यात येईल, असा शब्द त्यांनी दिला आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4621130.cms उद्धव ठाकरे यांचे हे विधान बालिशपणाचे आहे.

करुणा कर

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 05/06/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
सांब सदाशिव शंकर | नीलकंठ गौरीहर हे उमापती महेश | भूतनाथ गिरिजावर करि धारी त्रिशुल डमरु | हे नटवर शशिशेखर अंगि चिताभस्म लेप | सर्पमाळ व्याघ्रांबर मदन दग्ध करिसी तूच | हे त्रिनेत्र नंदीश्वर रौद्र तुझे तांडव ते | भीषण अन् प्रलयंकर शंभो कैलासनाथ | भालचंद्र गंगाधर तूच सत्य, शिव, सुंदर | करुणाकर, करुणा कर

शालेय विद्यार्थी व कम्प्यूटर प्रोग्रॅमिंग - एक अभिनव प्रयोग

लेखक अजय भागवत यांनी शुक्रवार, 05/06/2009 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
[मी हा लेख श्री. अभय जोशी ह्यांच्यासाठी त्यांच्या परवानगीने देत आहे.] लेखक: अभय बिंदुमाधव जोशी तारीख: १ मे २००९ प्रस्तावना शालेय विद्यार्थ्यांची संगणकाशी एका अभिनव प्रकारे ओळख कशी करून देता येईल याचे वर्णन या लेखामध्ये केले आहे. पुण्यातील एका नावाजलेल्या आणि पुरोगामी विचारसरणीच्या शाळेतील ७ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी या नवीन कल्पनेचे स्वागत कसे केले व या प्रयोगाचे रूपांतर एका आनंददायक उपक्रमात कसे केले हेही आपण या लेखात पाहू. संगणक आणि मुले - आजचे चित्र बहुतेक मुलांना उपजतच संगणकाचे अतिशय आकर्षण असते.

शिवसेना पुन्हा उभी राहील?

लेखक सुधीर काळे यांनी शुक्रवार, 05/06/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आमचे स्नेही तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा सभासद होतांना मला आनंद होत आहे. ह्या संकेतस्थळाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! सुधीर काळे, जकार्ता. शिवसेना पुन्हा उभी राहील? (पूर्वप्रसिद्धी - http://beta.esakal.com/2009/05/25131710/pailteer-sad-pratisad-about-sh…) मी एक सामान्य माणूस आहे. मी कुणी "शिवसैनिक' नाही; पण बाळासाहेबांबद्दल खूप आदर असलेला व शिवसेनेला मनोमन मानणारा असा एक मराठी माणूस आहे.

कोवळीक

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशाच्या खिडकीतुन सुर्य अलगद डोकवायचा, गर्भरेशमी त्याची किरणं आळसावलेल्या डोळ्यांनी मी टिपायचा. त्याच्या येण्याने आभाळाला लालसर झालर चढायची तीच पांघरुन माझी जाग ऊन्हे डोक्यावर येइतो झोपायची. ऊन्हं वितळायला लागली तेव्हा नकळत जाणवलं अरे..सकाळची कोवळीक आपण कधी अनुभवलीच नाही. विशाल

प्रिया

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 05/06/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसावळ्या केशांवरती कण वर्षेचा क्षण रेंगाळे , काजळडोही चमकता मोती पाहुनी चन्द्रही मनी जळे !! नागिणीसम तव बटा सळसळे कुठे पाहावे डोळा न कळे, उगाच लटका भाव नयनी जाणुनीया परि मनही चळे !! सखे तुझी ती मोहक कांती नवतीचेही मग भान गळे , पामर मी तव लावण्यापुढती प्रीत तुझी नच मला गमे !! तुझ्यात विरघुनी गेलो सखये विसरलो घटीका न पळे , कधीच गेलो हरवुनी नयनी प्रिये, माझे मला न कळे !! विशाल

निसर्ग सोबती

लेखक जागु यांनी शुक्रवार, 05/06/2009 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्ग माझा सोबती रममाण मी निसर्ग संगती डोंगर दर्‍या मने हिंडती तरंग लहरी मी नदी-सागरी माय बाप मज वृक्ष वल्ली फळे फुले ती सखे सोबती फुलपाखरे ती गोंडस हसरी कोकीळ स्वरात मज धुंदी मयुरासंगे तन डोलती पवन मुक्त मज छेडती वर्षा संगे स्वप्ने ओली दवस्पर्श तो रोमांचकारी ग्रिष्म वसंती आशा हिरवी शेत्-आगर ती अन्नदात्री विहीरी-तलाव तृष्णा भागती चंद्रचांदण्यांची दिपावली विजेची ती आतषबाजी सुर्य बिंबाचे तेज ललाटी संध्येची ती छाया अंतरी
Taxonomy upgrade extras