कांगावा
चित्रकार एम एफ हुसैन यांच्यातील कलाकाराबद्दल मला आदर आहे. मात्र, हिंदू देवदेवतांचे (विशेषतः सीता, सरस्वती आणि मला वाटते मारूती) अत्यंत असभ्य रेखाटन करून त्यांनी स्वतःच्या कलागुणांचा गैरवापर केला असे वाटते. कलेचे आणि कलाकाराचे स्वातंत्र्य हे प्रस्थापित कायदे, समाजव्यवस्था आदींचा किमान आदर राखत जबाबदारीने पाळले जावे असे वाटते.
आज हे सर्व लिहायचे कारण इतकेच की मला भारत सोडायचा नाही पण पर्याय नाही म्हणत हुसेनबाबांनी कत्तारचे नागरीकत्व घेतले आहे/घेणार आहेत. त्यांनी म्हणे तसे ते मागितले नव्हते तरी देखील तेथील राजाने त्याला बहाल केले.
मिसळपाव