Skip to main content

कवितेचा मार ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 01/04/2010 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा मार ! ! ! जेष्ठ कवींचे संमेलन, भरले श्रोत्यांनी प्रांगण. कवींना चढे अगणित स्फुरण, श्रोत्यांची स्थिती दारूण. झडती कवितेच्या अगणित फैरी, ए के – 47 च्या माऱ्या परी. श्रोते जाहले सैरावैरा, धडकी भरे त्यांच्या उरी. आधीच समस्त श्रोते वेठीला, त्यात एक कवी अवतरला. छेडीला भीमपलास कवितेचा, उतावीळ श्रोते भैरवीला. . जाहले तास दोन तास, तरीही ना सरे त्याचा अट्टाहास. वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस “ काही उपाय सुचवा हो “ ! वदली ती गौरांगना सत्वर, “ तुम्हीच काही सुचवा गुरुवर, सहते वीस वर्षे हा कवितेचा मार उपाय परी ना गवसला आजवर.
काव्यरस

नाचरी गाय - २ (आधारित)

लेखक चित्रा यांनी गुरुवार, 01/04/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधीची कविता आणि पूर्वपीठिका/संदर्भ इथे http://www.misalpav.com/node/11707 (पामेला ट्रॅव्हर्सच्या मेरी पॉपिन्समधील एका कथेवर आधारित) हा भाग जरा लांबला, पण मूळ कथेतील वर्णनाचा विस्तार पाहता हे ठीक वाटले. माझ्या संगणकावर घातलेले तक्ते दिसत नाहीत, म्हणून वाचायला अजून सोपी करता आली नाही. (असेच गेले दिवस बहु अन अशाच गेल्या रात्री अनेक थांबेना फडफडते शेपूट आणि नाचरे पाऊल एक) ..(येथून पुढे सुरू ....
काव्यरस

सलाम मुंबईकर

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 01/04/2010 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वींची घटना आहे. मी सकाळी कामावर येण्यासाठी "बेस्ट"च्या स्टॉपवर आलो. सकाळी ७-७.३० ची वेळ असेल. बसचे सुटायचे ठिकाण असूनही बस बर्‍यापैकी भरलेली. मला मागील जागा बसायला मिळाली. "बेस्ट"मध्ये डाव्या बाजूला तीन सीट महिला, ज्येष्ठ नागरिक व अपंग यांच्यासाठी राखीव असतात. त्यापैकी अपंगांसाठीच्या सीट रिकाम्या होत्या. एक आजी, आजोबा बसमध्ये चढतात. ते त्या अपंगांसाठीच्या रिकाम्या जागेकडे जाऊ लागतात. आजोबा त्या जागी बसणार तोच आजी: "आहो, त्या जागा अपंगांसाठी आहेत. आपण उभे राहू." आजोबा: "अग कोणी आले तर आपण उठूयात.

रानातली वाट - The Way Through the Woods

लेखक sur_nair यांनी गुरुवार, 01/04/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावर बऱ्याच अनुवादित कविता दिसल्या म्हणून ही रुपांतरीत कविता व त्यासंदर्भात मी लिहिलेला छोटासा लेख इथे टाकत आहे.
काव्यरस

घाट चढा आता

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 01/04/2010 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया. सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...) (राजेश घासकडवींचे अन Nile यांचे खास आभार.
काव्यरस

'साहित्य विश्व' संकेतस्थळाचे अनावरण

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 01/04/2010 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात. गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म.

आल्मंड बटर

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 31/03/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
आल्मंड बटर आजकाल पीनट अ‍ॅलर्जी मुळे इथे बर्‍याच शाळा 'पीनट फ्री' असतात. माझ्या लेकाची शाळाही याला अपवाद नाही. त्यामुळे साहाजिकच पीनट बटर ऐवजी आल्मंड बटर वापरायला सुरुवात केली. पण हे आल्मंड बटर एक तर गावातल्या दुकानात मिळत नाही आणि दर वेळी ५० मैलावरच्या दुकानात तेवढ्यासाठी जायची माझी तयारी नव्हती, तेव्हा घरी प्रयोग केला. दोनदा ट्रायल अ‍ॅन्ड एरर केल्यावर लेकाला आवडेल असे आल्मंड बटर जमले. साहित्य १/२ कप बदाम चिमुटभर मीठ १ टी स्पून वेजिटेबल किंवा कॅनोला तेल कृती ओवन २५० F ला तापत ठेवा. ओवन तापला की ट्रे मधे बदाम ठेऊन ओवन मधे २०-२५ मिनिटे भाजुन घ्या.भाजताना शेवटच्या ५ मिनिटात लक्ष ठेवा.

तीन झुरळांचं शुभेच्छापत्र!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 31/03/2010 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रीण एक हरहुन्नरी कलावंत आहे. तिच्याचसारखी तिची पाच वर्षांची मुलगीदेखील मनस्वी, कलासंपन्न व आनंदी स्वभावाची आहे. मैत्रिणीला नवनवीन कल्पना प्रत्यक्षात राबविण्यात, त्यांना आकार देण्यात समाधान मिळते. तिची लेक तिच्यापेक्षा कलेत एक पाऊल पुढेच आहे. खेळकर, दंगेखोर, खट्याळ, कल्पक आणि मनस्वी!! आजूबाजूच्या जगाचे तरल निरीक्षण तिच्या चित्रांत पाहायला मिळते. पण त्याविषयी बोलायची तिची तयारी नसते बरं का! तुम्ही तिला त्या चित्राबद्दल विचारलंत की ती तुमच्या हातून सटकून पसार होते. परवा ह्या मैत्रिणीचा वाढदिवस झाला.

(बस्स्स नकोस आता)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 31/03/2010 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
आमचं पण रनिंग बिटवीन द विकेट..... ;-) अर्थात आमची प्रेरणा : इथे आणि इथे आणि इथेही कवितेमागे धावणं थांबवलं आजपासुन.. कारण ती सुचतच नाही मूळी आणि ट ला ट संयोगाने आलीच.. तरी व्याकरणाचा गंध नाही मला मग एवढी खर्डेघाशी कशाला? मला इतकं चिडवून, रडवून (डोक्यावरले केस) उपटून उपटून जमलीस तर काय जमलीस? किती आणि कसं सांगू? कालपर्यंत होती तितकी, आज नाहीये आता खाज? विडंबनांमागे धावणं... सुरू आजपासून ! 'नवइडंबनकार इरसाल खोटे'
काव्यरस