शाहीन..!
"लौकरच तुझ्यावर मी एक लेख लिहिणार आहे. तुझ्या फोटोसकट. तुझी परवानगी आहे का?" -- मी.
"माझं आयुष्य म्हणजे एक ओपन कार्ड आहे तात्या.. माझी फुल्ल परवानगी आहे" - शाहीन.
दिलिपअन्ना शेट्टी. मुलुंडच्या शास्त्री मार्गावर उमापॅलेस नावाचा एक डान्स बार आहे, त्याचा चालक-मालक. त्या सा-या शेट्टी फॅमिलीचा मी आयुर्विमा दलाल. त्याची बायको, दोन मुली - सा-यांच्या आयुर्विमा पॉलिसीज उतरवण्याचे काम माझ्याकडे. माणूस मालदार आहे त्यामुळे सतत कुठल्या ना कुठल्या पॉलिसीज माझ्याकडून घेत असतो. असाच एके दिवशी मी पॉलिसीजच्याच काही कामानिमित्त त्याच्याकडे गेलो होतो. शेट्टी बिझी होता.
मिसळपाव