Skip to main content

मी पाहिलेला गणेशोत्सव

लेखक पारा यांनी गुरुवार, 21/10/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी गणेशोत्सव निमित्त, मी आमच्या गोव्याच्या घरी गेलो होतो. आणि अनुभवाने मनाला आलेल्या उन्मनी अवस्थेचं वर्णन कोणीही आपल्या मातृभाषेतूनच सर्वाधिक सक्षमपणे करू शकतो असं माझं मत आहे. ह्या पूर्वी मी तिथे गेलो होतो त्याला आता सहा वर्ष उलटून गेली, त्यामुळे धूसर आठवणींखेरीज माझ्या गाठीला त्यातलं फारसं काही उरलेलं नव्हतं. ह्या आठवड्यात मी एक अत्यंत वेगळा गणेशोत्सव पाहिला. कोकणात गणपती हा अतिशय मानाचा उत्सव, तसं पाहता, दिवाळी, दसऱ्यापेक्षाही हा सण जास्त उल्ल्हासाने, सुंदरतेने साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी तर कोण गजहब. चतुर्थीला गणेशाची सजवलेल्या मखरात प्रतिष्ठापना केली जाते.

फ्लावरच्या देठचि भा़जि

लेखक Shubhangi Pingale यांनी गुरुवार, 21/10/2010 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
first time देत आहे काहि चु़कलल्यास शमा करा आपण फ्लावरचि भाजि करतो आणी त्याचा देठ फेकुन देतो पण तस न करता तो बारिक चिरुन घ्यावा एका टोपात पाणि आणि मिठ टाकुन थोडावेळ तसच ठेवावे. आता फोडणी टोपात तेल घालावे राई, जीर, हळ्द, हिग घालावे कादा घालावा तो बदामि झाला कि त्यात आवडी नुसार मिरचि पावडर आणि त्यानुसार साखर घालावि न॑तर भाजि निथळून घालावि टोपावर झाकण घालुन त्यात थोड पाणी घालावे (ताटात). थोडावेळाने टोप ऊचलुन कु़कर मध्ये ठेवावे चार ते पाच शिट्टया घेवून ब॑द करावा (देठ थोडा शिजायला ‍वेळ लागतो.

कोजागिरी

लेखक कच्चा पापड पक्का पापड यांनी गुरुवार, 21/10/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
सोसयटी मध्ये कोजागिरी साजरी करणार आहे. गाण्याच्या भेन्ड्या नेहमी खेळ्तोच. काही नविन खेळ ,कार्यक्रम कुणाला माहित असतिल तर कळवा.

50 First Dates आणि गोजिरी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 21/10/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही) चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे.

गिलक्याचे भरीत

लेखक मीरसिका यांनी गुरुवार, 21/10/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
गिलक्याचे भरीत कसे करतात ते कोणी सांगू शकेल काय? वांग्याचे भरीत जसे करतात तसेच गिलक्याचे पण भरीत करतात काय?

दर्शने १.

लेखक शरद यांनी गुरुवार, 21/10/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
3

को जागृति ? को जागृति ? @@@@@@ मी ! मी !

लेखक स्पंदना यांनी गुरुवार, 21/10/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख लिहिताना आम्ही परकाया प्रवेश केला आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी) सीटटया न अगदी दोन दिवस डोकं खाल्ल होत ! तो, मी अन आमच्याच ऑफिसातली आणि दोघं असं मिळून 'पार्टी ' करायची असा त्याच्या मनातला बेत तो माझ्या गळी उतरवायला बघत होता. आता या २०१० साली तुम्ही म्हणाल 'मग काय ? जायचं ! त्यात काय असं नव ?' पण मंडळी ही गोष्ट; हे आत्ता जे सार पार्टी, पिण, अन धमाल करत फिरणं सुरु असतंय त्ये सार करणं फकस्त पिक्चर मध्ये असायचं, त्या काळची !!

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ४

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोत कैद झालेले भुत/आत्मा. विशेष नोंद : १) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही. २) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे. ३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत. ४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.