Skip to main content

पनीर टिक्का

लेखक प्राजक्ता पवार यांनी सोमवार, 13/12/2010 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : पनीर टिक्का : पनीर - २५० ग्रॅम लाल , पिवळी, हिरवी सिमला मिरची आले लसुण पेस्ट - १ चमचा मीठ लाल मिरची पावडर - १ चमचा गरम मसाला - १/२ चमचा आमचुर पावडर - १ चमचा लिंबाचा रस - १ चमचा घट्ट दही - १/२ वाटी तंदुरी कलर चाट मसाला - १ चमचा तेल - १ चमचा चटणी : दही - १/२ वाटी कोथिंबीर हिरवी मिरच्या - २

तार मनाचे दे झंकारून

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 13/12/2010 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
तार मनाचे दे झंकारून सूर शब्दांचे अलगत छेडून तार मनाचे दे झंकारून ....!! भावबंध हे मनगर्भिचे उधळण करतील चितरंगाचे सुप्तभाव ते पुलकित होता हात मोकळे तू द्यावे सोडून ....!! मेघ गर्जुनी करतील दाटी सुसाट वारा रेटारेटी मनी विजाही करता लखलख थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!! मनफ़ुलांनी गंधीत वारा दे दरवळूनी भावफ़ुलोरा बोल अभय जे कानी येते तन्मयतेने घ्यावे ऐकून ....!! गंगाधर मुटे ..........................................

पानगळ सुरु झाली आहे !!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 13/12/2010 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
हाडे गोठवणारी थंडी सुरु झाली आहे नुकतीच हलक्या फुलक्या पिसासारखा बर्फ भुभुर्तोय कधीचा!! हाडाची सापळे दिसावी अशी झाडे दिसू लागली आहेत पोपटी गर्द श्रीमंती हरवून गेली आहे स्वप्नात ... झाडाच्या फाद्यावर रोग पडावा तशी दिसू लागलीत ही झाडे कुठे दूर उडून गेलीय ही पक्ष्याची जमात ?? आपली पिलावळ घेऊन उबदार प्रदेशात सातासमुद्रापलीकडे...
काव्यरस

तुम्हाला अमेरीका कशी वाटते?

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/12/2010 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने.

बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२

लेखक भानस यांनी सोमवार, 13/12/2010 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
जिन्नस * चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल * चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल * चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे ) * दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर * तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य मार्गदर्शन कडवे वाल बारा-चौदा तास भिजवून नंतर मोड येण्यासाठी पंधरा-सोळा तास बांधून ठेवून नंतर सोलून घ्यावेत. थंड प्रदेशात मोड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. कढई/पातेले मध्यम आचेवर ठेवून चांगले तापले की चार चमचे तेल घालावे.

आवळ्याचे लोणचे----

लेखक निवेदिता-ताई यांनी रविवार, 12/12/2010 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- वीस-पंचवीस मोठे आवळे, एक वाटी मीठ, एक वाटी तेल, पाव वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी मिरची पावडर, तीन टे.स्पुन जिरे, तीन टे. स्पुन ओवा, दोन टे. स्पुन पांदेलोण. कॄती :- प्रथम आवळे चाळणीवर ठेवुन सात-आठ मिनिटे वाफ़वून घ्या, नंतर त्यातील बिया काढून टाका, प्रत्येक आवळ्याच्या चार फ़ोडी हलक्या हाताने करा, नाहितर लगदा कराल, मोहरीची डाळ थोडावेळ उन्हात ठेवावी, व नंतर त्याची पुड बनवा, पुड खुप बारीक नको. त्यात थोडे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालुन ती चांगली फ़ेसुन घ्यावी.ओवा-जिरे न भाजता पूड बनवा,आता हे सगळे एकत्र करा.

लेमन ट्री

लेखक लतिका धुमाळे यांनी रविवार, 12/12/2010 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेमन ट्री. चित्रपटा बद्द्ल मी प्रथमच लिहित आहे. सिनेमाचे नाव_ लेमन ट्री(२००८) दिग्दर्शक_ इरान रिकिल्स कलाकार_ हैना अब्बास, अली सुलेमान,डोरॉन टॅवोरी, रोना लिपाझ-मिशेल. मराठी, हिन्दि, इग्लिश चित्रपट आपण नेहमीच बघत असतो. या वेळेल जर्मनीत आल्यावर ठरवले की दुसऱ्या भाषेतील चित्रपट पहायचे, अर्थात इंग्रजीत डब केलेले.त्यामुळे असे चित्रपट मिळतात का हे बघायला सुरवात केली. तसे निरनिराळ्या भाषेतील चित्रपट होते खूप, पण फ़क्त मूळ भाषा आणि जर्मन भाषेत डब केलेले, त्यामुळे ते सर्व बाद. मग एक मिळाला हिब्रू आणि अरब भाषेतील व जर्मन सबटायटल्स असलेला. तो मी घेऊन आले.

आमचा लाडका रजनी

लेखक वेताळ यांनी रविवार, 12/12/2010 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड हा आज ६१ वर्षाचा झाला (आश्चर्य आहे नाही). त्याबद्दल लाडक्या रजनीचे सर्व मिपाकर चाहत्याकडुन अभिनंदन. नुकताच रजनीने एश्वर्या रॉय बच्चन सोबत रोबोट नावाचा सुपरहिट्ट सिनेमा केला होता. भविष्यातही तो आपल्या सर्वाचे मनसोक्त मनोरंजन करील अशी आशा करतो.परत एकदा त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच अजुन एक देशाचे लाडके नेत्रुत्व मा. शरदचंद्र रावजी पवार साहेब उर्फ साहेब ह्याचा देखिल वाढदिवस आहे. त्याना देखिल हार्दिक शुभेच्छा. देव त्याना उदंड आयुष्य देवो. परत एकदा दोन्ही मराठी माणसांचे हार्दिक अभिनंदन.

लाडका रजनी

लेखक वेताळ यांनी रविवार, 12/12/2010 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा आवडता लाडका चतुरस्त्र अभिनेता रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड आज ६१ वर्षाचा झाला(मला अजुन आश्चर्य वाटते).त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व रजनी फॅन्सकडुन त्याचे हार्दिक अभिनंदन.त्याने नुकताच एश्वर्या रॉय सोबत रोबोट हा विक्रमी उत्पन्न मिळवुन देणारा चित्रपट केला आहे.भविष्यात तो अजुनही जोमाने नवे मनोरंजक चित्रपट सर्वाना देईल अशी मी आशा करतो. परत एकदा रजनी चे अभिनंदन.