Skip to main content

'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!

लेखक चिंतामणी यांनी रविवार, 26/09/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासुन अनेकांचे फोन, इमेल द्वारे एकच संदेश येत होता. ऑर्कुट उघडु नकोस. अकांउट हॅक होइल. (मिपामुळे तिकडे नसतोच मी). आज सकाळमधे सविस्तर बातमी आली आहे. 'ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ! 'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर बॉम सबाडो नावाच्या 'बग'ने शनिवारी धुमाकूळ घातला. प्राथमिक माहितीनुसार हा 'बग' पासवर्ड हॅकर असून, तो संबंधित "ऑर्कुट'धारकाचे अकाऊंट हॅक करतो. 'ऑर्कुट'धारकांच्या स्क्रॅपबुकवर त्यांच्या मित्रगटातील व्यक्तीकडून 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप येतो. इंटरनेट एक्‍सप्लोररमध्ये त्या स्क्रॅपवर क्‍लिक केल्यास एक्‍सप्लोरर हॅंग होते. ते पुन्हा सुरू करून ऑर्कुटवर लॉगिन होण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीचा पासवर्ड हॅक केला जातो, असे इंटरनेटविश्‍वातील तज्ज्ञांनी म्हटले आहे. या 'बग'मुळे ऑर्कुट आणि गुगलच्या अकाउंटचे कुकीज चोरून त्या आधारे इतरांच्या स्क्रॅपबुकवर स्क्रॅप टाकले जातात. त्याचबरोबर काही वेळेस काही नवीन कम्युनिटी तुमच्या अकाऊंटला जोडल्या जात असल्याचे आढळून आले आहे. 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप आला असल्यास... १. संबंधित स्क्रॅपवर कोणत्याही स्थितीत क्‍लिक न करता ऑर्कुटवरून तातडीने लॉगआऊट व्हा. २. तुमच्या अकाऊंटमध्ये कोणत्या नवीन कम्युनिटी आल्या असतील, तर त्या तातडीने डिलिट करा. ३. तुमच्या गुगल अकाऊंटचा पासवर्ड, सेकंडरी ईमेल, मोबाईल क्रमांक सर्व तातडीने बदला. http://72.78.249.124/esakal/20100925/4626656415523668173.htm

वाचने 3097
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

धन्यवाद....मी पासवर्ड लगेचच बदलला..पण ओर्कूट वरील स्क्राप कसे डिलीट करु.. लोग-इन करायचे नाही न...कॄपया माहिती द्या.

दोन स्क्रॅप येऊन पडले होते. हॅपी 'बॉम सबाडो' असे म्हणून. मला काहीच कळले नाही. धडाडीचे कष्टाळू कार्यकर्ते श्री कुंदन यांना त्यांच्या कामात व्यत्यय आणून आम्ही विचारले की, बॉम सबाडो' काय भानगड आहे. हा भला माणूस काही दिवसापासून सरळ उत्तर देतच नाही. ' व्हायरस' आहे. दीर्घ पॉज घेतला. काही क्षणाने 'ऑर्कूटवर' कलमडू नका म्हणाला. देवदत्ताने मग एक दुवाही दिला तेव्हा तो व्हायरस असल्याचे कळले. अशा व्हायरस बद्दल अधिकृत माहिती कुठे मिळते असे विचारायचे होते ? -दिलीप बिरुटे

In reply to by गांधीवादी

नाही हो गांधीवादी साहेब. आयुष्य हे ऑर्कुट ईतके सोप्पे नाहीये ना, ह्या कटु आठवणी सोबत घेऊनच आयुष्य पुढे न्यावे लागते..

In reply to by गांधीवादी

आयुष्यातील काही कटु आठवणी अश्याच easily delete करता येतात का हो ? त्या तशा आठवणी अर्काईव्ह मध्ये टाकून द्यायच्या असतात. त्या आठवणी रोज रोज उगाळत बसलात तर त्यांचा व्हायरस इतर सर्व लाईव्ह फाईल्स करप्ट करतो.

ऑर्कूटवर एकेकाळी खातं होतं ह्याची ह्या लेखाच्या निमित्ताने याद आली! पासवर्ड सोडा, युजर आय्डीपण विसलोय!