Skip to main content

एक नवी काळजी

लेखक शुचि यांनी सोमवार, 13/12/2010 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माझी मुलगी पुढील वर्षी मिडल स्कूल मध्ये जाणार आहे. म्हणजे आताची शाळा बदलून मोठ्या शाळेत प्रवेश करणार आहे. ______ काही दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेमध्ये पालकांची सभा होती. या सभेमध्ये ही मुलं ज्या "मिडल स्कूल" मध्ये जाणार , त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना आमंत्रीत केले होते. हेतू हा होता की मुख्याध्यापकांनी "मिडल स्कूल" ची माहिती द्यावी आणि पालकांना प्रोत्साहित करावे. पण झाले भलतेच. या मुख्याध्यापकांनी सुरुवातीलाच भलताच सूर लावला. त्यांनी भाषणात सांगितले की - आमच्या शाळेत चाकू/सुरे सापडण्याच्या ज्या घटना घडतात, त्यामधील हत्यारे अतिशय लहान असतात. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही.

आज ओंजळित...

लेखक ज्ञानराम यांनी सोमवार, 13/12/2010 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज ओंजळित... फुले अचानक पडली....... पडताच ओंळित... हलकेच मग रडली विचारण्या आधिच... मिट्ल्या पाकळया त्यांनी.. कोमेजली तरीही ... गंध देऊन नीजलि.......... आज चंदनाचे.... खोड मज दिसले.... मज पाहुनिया उगाच... मनी अलगद ह्सले..... विचारण्या आधिच... झिजुन गेले सारे.... झिजता झिजता... त्याने... दिले सुगंध सारे...... आज पावसाचे.... थेंब मजला भेट्ले.. वाटेत चालताना... डोळ्यात सारे दाटले.... विचारण्या आधिच... भिजवले डोळे त्यांनी.... पण,,,,,, भिजल्या डोळ्यांनि तेव्हा काहिच नाहि वाट्ले...........

स्वातंत्र्यलक्ष्मीचे पुजारी: गोवा

लेखक प्रीत-मोहर यांनी सोमवार, 13/12/2010 17:06 या दिवशी प्रकाशित केले.

गोवा: पुर्वपीठिका

रविवारी १९ डिसेंबर. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठ्ठ? कॅलेंडरच्या इतर दिवसासारखाच एक दिवस. पण मी म्हणेन आजच्याच दिवशी भारत पूर्णपणे स्वतन्त्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी भारताचा स्वातंत्रदिन म्हणुन साजरा होत असला, तरी गोमंतक हा भारताचा अविभाज्य भाग १९ डिसेंबर १९६१ या दिवशी पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या जुलमी राजवटीतुन स्वतंत्र, मुक्त झाला. म्हणुन हा पुर्ण स्वातंत्रदिन! त्यानिमित्ताने गोव्याबद्दल आणि ह्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल सांगायला खूप खूप आवडेल - गोव्यात पोर्तुगिजांचा प्रवेश --युरोपिय देशांमधे भारत तसा सुपरिचित होता.

सायबानू मीच त्यो .... भाग २

लेखक स्पा यांनी सोमवार, 13/12/2010 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानू मीच त्यो .... भाग १ *** त्यानंतर पुढे काय झाले त्यांना कळलंच नाही ,फक्त तिन्हीसांजेच्या भयाण प्रकाशात, ती मांजरे, तो चिंचेचा वृक्ष, त्यांची बंगली, आणि कोर्टाची इमारत भोवताली गरागरा फेर धरून नाचत आहेत एवढाच जाणवत होतं. जाग आली तेव्हा ते बंगल्यातच होते. डोक भयानक ठणकत होतं. हनम्या समोरच उभा असतो, सोबत डॉक्टर दिलीप बिरुटे! हे इथे कसे काय?

आम्ही काय म्हणूं धार्मीक

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/12/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काय म्हणूं धार्मीक
आम्ही काय म्हणूं धार्मीक | आम्ही जगाचे नास्तिक ||१|| आम्ही जप नाही केले कधी | रामनाम नाही आमच्या ओठी ||२|| नाही कधी घडला संतसंग | पाण्यावीण दुष्काळी मेघ ||३|| देवाचीये न लागू चरणा | धुळीच्याच पडलो प्रेमा ||४|| नाही कधी गेलो पंढरीसी | कधी नाही बोललो सावळ्याशी ||५|| कधी नाही लिन झालो | कधी नाही पायी पडलो ||६|| जपजाप्य कधी केले | आठवणीतून निघून गेले ||७|| पंढरीच्या पांडूरंगा | आलो तुझीया संगा ||८|| पापपुण्य निघुनी गेले | माझे स्वरूप तुझे झाले ||९|| सच्च्या म्हणे कोण नास्तिक?
काव्यरस

तुम्हिच सुचवा शीर्षक .........

लेखक पियुशा यांनी सोमवार, 13/12/2010 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
(जाहिरातींचे विडंबन आहे सहज म्हनुन! खुप डोक खाजवल पन नाहि सुचल तुम्हिच करा बारस !) सकाळचे सहा वाजले पहिला गजर झाला आणि आणि कोणत्या गाढवाने (मीच )लावला हा असे म्हणत तो रागारागात बंद करून मी पुन्हा झोपी गेले ,आई आली ए म्हशे (प्रेमाने म्हणते )उठ आता लवकर किती वेळ लोळणार ? ए ss तू जा .........