Skip to main content

ठाणे खादाडी कट्टा

लेखक स्पा यांनी गुरुवार, 07/04/2011 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण. ("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे.

पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 07/04/2011 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे - http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्‍याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्‍याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे. हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का?

मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ

लेखक लांबदेव यांनी गुरुवार, 07/04/2011 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
मर्ढेकरांची कविता - झोपली ग खुळी बाळे - वैश्विक व दुसऱया महायुध्दकालीन संदर्भ मर्ढेकरांची ही कविता दुसऱ्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आहे. ह्या कवितेत अणुबाँब आहेत. रॉकेट आहेत. भारतीय , अमेरीकन शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय शस्त्रस्पर्धा आहे. भगवतगीता आहे. जागतीक शांततेचा प्रश्न आहे. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. खालील दुव्यावर टिचकी मारा झोपली ग खुळी बाळे लांबदेव

गणपा आणि नाटक्या

लेखक नाटक्या यांनी गुरुवार, 07/04/2011 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बरेच दिवसांपासून गणपाच्या हातच्या अफलातून पाककृती खाताना हा विचार करत होतो की याच्या बरोबर कोणते कॉकटेल चांगले लागेल. घरी थोडेफार प्रयोग केल्यानंतर असे वाटू लागले की आपण गणपाशेटलाच विचारावे का अश्या जॉईंट-व्हेंचर बद्दल? आणि गणपाशेठनी झटकन परवानगी दिली. थोडक्यात म्हणजे मी गणपाशेटच्या जोरावर माझी पब्लीसीटी करतो आहे म्हणाना. असो नमनाला घडाभर तेल पुरे. तर एकंदर योजना अशी की गणपा एक पाकृ आणि मी त्या बरोबर जमेल असे एक कॉकटेल असा विकांताचा मेन्यू म्हणन द्यायचा. तर मंडळी जर ही कल्पना आवडली असेल तर प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

अशीच भटकंती

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 07/04/2011 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्र १ छायाचित्र २ छायाचित्र ३ छायाचित्र ४ छायाचित्र ५ छायाचित्र ६

मासे २४) पालकं

लेखक जागु यांनी गुरुवार, 07/04/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्‍याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते. साहित्य : पालकं ५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन १ ते २ कांदे चिरुन हिंग, हळद मसाला १ ते २ चमचे आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे तेल, मिठ गरम मसाला १ चमचा. ही पालके पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे.

आम्रखंड

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 06/04/2011 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १/२ किलो ताजा गोड चक्का १/२ किलो साखर दीड कप ताजा आंब्याचा रस (तुम्ही कॅन मधे मिळणारा आंब्याचा रस वापरु शकता) चारोळ्या आवडत असल्यास किंचित वेलची-जायफळपूड (ऐच्छिक) पाकृ: चक्क्यात साखर मिसळून २ तास झाकून ठेवावे. त्यात मग आंब्याचा रस , वेलची-जायफळपूड घालून, पुरण यंत्राला बारीक चाळणी लावून त्यातून फिरवून घ्या म्हणजे नीट एकजीव होईल. चारोळ्या घाला, वरून केशरकाड्या घालून सजवा. .