Skip to main content

मिपाकर स्वच्छंदी पाखरू यांचे अभिनंदन...

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी मंगळवार, 26/04/2011 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपले मिपाकर आणि आमचे मित्र स्वच्छंदी पाखरु यांना नुकतेच २० एप्रिल २०११ रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.... त्याबद्दल समस्त मिपाकरांकडून शुभेच्छा!... ...जाम गोड आहे पोरगी...! सध्या ते स्वतः स्वगृही... मायदेशी असलेने फोटु टाकु शकत नाहीत. वेळ मिळाला कि टाकतील!.. तरी त्याना शुभेच्छा आणि नविन बाळाला आशिर्वाद...!

चष्मा असुनी दिसले नाही -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 26/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले - ) चष्मा असुनी दिसले नाही - रस्त्याच्या पलीकडले , प्रथम तुला पाहियले ; पाउल खड्ड्यात कसे पडले ? शर्ट नवा मी खास घातला - पँट नवी, अन् चष्माहि नवा ! त्या दिवशी का प्रथमच माझे बूट सांग अडखळले ? आवडते कपडे त्या रात्री ; खड्ड्यातच फाटले किति तरी ... परीटघडीच्या त्या कपड्यांचे रफू न मज परवडले !

पिउनी अमृत घेउनी संचित...!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/04/2011 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याकरता मिपाचे डॉ रमताराम यांचे मनापासून आभार.. पाखरा जा.. (येथे ऐका) पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पु लं. चित्रपटकार, नाटककार, व्याख्याता, साहित्यिक, एकपात्री, दाता, इ इ इ असलेला एक अफाट खेळिया. परंतु या छोटेखानी लेखाचा संबंध संगीतकार आणि गायक पुलंशी आहे.. 'गमपसां धसां' असा आलाप असलेली गाण्याची सुरवात. 'जा' या अक्षरावरचा सुंदर निषाद. गमम, गमधप रेसा या स्वरावलींनी पूर्ण होणारे 'प्रेमळ, शीतल छाया..' हे शब्द. सारंच अतिसुंदर! नंद रागाचा भक्कम बेस असलेलं हे गाणं.

गीत

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/04/2011 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात.
काव्यरस

पोर्ट्रेट फोटोग्राफिचा एक प्रयत्न.

लेखक येडाखुळा यांनी मंगळवार, 26/04/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री शरद यांचा "मिपावरील छायाचित्रे ... एक निरिक्षण" हा लेख वाचला आणि मला माझ्याकडे असलेली काही पोर्ट्रेट अपलोड करायचा मोह झाला. ही काही फार सुंदर छायाचित्र आहेत असं नाही म्हणता येणार पण त्या क्षणी मला जे कॅमेर्यात पकडावस वाटलं ते इथे मांडतोय. सासवड-जेजुरी च्या परिसरात फिरत असताना हा धनगर दिसला. यांची पागोटे घालण्याची पद्धत खूप मस्त असते.

ये दौलतभी ले लो

लेखक शरद यांनी मंगळवार, 26/04/2011 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौलत भी ले लो गत दिनांची आठवण कोणाला येत नाही ? त्या दिवसांतील आठवणी निरनिराळ्या असतात. भर्तृहरि " सा रम्या नगरी महान स: नृपती.." म्हणेल व शेवटी "कालाय तस्मै नम:" म्हणून मोकळा होईल तर कोणाला पुण्यातील "बादशाही खानावळ " आठवेल. भवभुतीच्या उत्तर राम चरित्रातील राम व सीता यांना अयोध्येत, राजवाड्यात ऐषारामात असतांना सुद्धा वनवासातील झोपडीत गप्पा मारत कंठलेली रात्र आठवून " रात्रीरेव व्यंसरित " असे म्हणावे वाटेल. एखादा नभातील चंद्र पाहून "ती न आर्तता ऊरात ,," म्हणत दु:खाला वाट करून देत असेल तर दुसरा एकामेकावर उधळलेल्या फूलांची आठवण करत " गेले, ते दिन गेले " असे उसासे टाकत असेल.

माझा देश वेगळा...

लेखक हैयो हैयैयो यांनी मंगळवार, 26/04/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
तूही मीही एकाच देशाचे नागरिक असे म्हणतोस.. परंतु, मित्रा! तुझा देश वेगळा, माझा देश वेगळा.. तुझा देश मातीचा.. माझा देश माणसांचा.. तुझ्या देशाची सीमा काट्यांच्या कुंपणांची.. माझ्या देशाची सीमा फुलांच्या पाकळ्यांची.. तुझ्या राष्ट्रगीतांत नुसतेच शब्द.. माझ्या राष्ट्रगीतांत जिवंत संगीत.. तुझा देश रक्तरंजित चरित्र, माझा देश सुंदरशी कविता.. तुझ्या देशांत शिरगणती.. माझ्या देशांत विचारगणती.. तुझा देश कायद्याचे राज्य.. माझा देश प्रीतिचे स्वराज्य.. तुझा देश वर्णतंट्यांचा माझा देश इंद्रधनुष्याचा.. तूही मीही एकाच देशाचे नागरिक असे ह्मणतोस.. म्हणतही असतील, म्हणू देत.. परंतु, मित्रा! तुझा देश वेगळ
काव्यरस

भ्रष्टाचारी कलमाडी अखेर अटकेत

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 26/04/2011 04:53 या दिवशी प्रकाशित केले.
अखंड भ्रष्टाचाराचे व्रत घेतलेले खिलाडियों के खिलाडी सुरेश कलमाडी अखेर जेरबंद झाले. राष्ट्रमाता सोनियांवरील अलोट निष्ठाही त्यांना तारु शकली नाही. आता ह्याला शिक्षा होते का नाही, अजून काही मोठे मासे हा अधम मनुष्य पकडून देतो का वगैरे माता सोनियाच (युवराज राहुलजींच्या संमतीने) ठरवेल. पण निदान पुढच्या विलेक्शनला पुणेकर ह्या नालायक इसमाला निवडून देणार नाहीत अशी एक अंधुक आशा! जाता जाता, १९९८ च्या इलेक्शनच्या वेळी भाजपा व शिवसेनेने ह्या इसमाला पाठिंबा देऊन म्हणे एक "धूर्त, मुरब्बी" खेळी खेळली होती. त्याची आठवण करुन देणे भाग आहे.