Skip to main content

निओ-अद्वैती पसायदान

लेखक मूकवाचक यांनी गुरुवार, 26/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आता भासात्मके देवे। येणे वाग्यज्ञे कोपावे| कोपोनी मज द्यावे। कसाबदान हे|| जे सुष्टांची वीरता सांडो। तया निराकारी रती वाढो| दुष्टा अकस्मात जडो। प्रेम शांतीचे|| दुरिताचे जीवित जावो। विश्व अधर्म सूर्ये पाहो| जो जे ढापील तो ते लाहो| प्राणिजात|| गर्जत विकल मंडळी| नश्वरनिष्ठांची मांदियाळी| धडपडत भूमंडळी| भेटतू भूता|| करा हीनबुद्धीचे तांडव| वासनाविकृतींचा ठाव| बोलती हे पुंगव| तर्कट्यांचे|| मानवास जे लांच्छन| मुखंड जे बुद्धिहीन| ते सत्याचे सदा खंडन| करिते होतू|| किंबहुना सर्व सुखी| मत्त होवोनी तिन्ही लोकी| त्याजिजो आदिपुरुषी| अखंडित|| आणि ग्रंथोपजीविये| विशेषी लोकी इये| इष्टानिष्टनकळे| होआवेजी|| येथ म्हणे श्रीक्रौर्येश्वरावो| हा होईल दानपसावो| येणे वरे हरिभक्त| दुखिया झाला|| (पुन:प्रकाशित)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2008
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ॐ क्रांती: क्रांती: क्रांती:

ज्ञानीयांचा राजासुद्धा विडंबनातून सुटला नाही तर... विडंबन छान जमलं आहे तरीही आतून कुठेतरी वाटतंय की निदान पसायदानाचं तरी विडंबन व्हायला नको होतं. असो... आमच्या मनाचा हळवेपणा... अक्षरे गाळून वाची । कां तें घाली पदरिचीं ॥ नीघा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ॥ - दासबोध, दशक मूर्खलक्षणनाम, समास मूर्खलक्षण