Skip to main content

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ - बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था?

लेखक आंसमा शख्स यांनी शुक्रवार, 24/06/2011 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विषयी अनेक प्रकारची भीती प्रसारमाध्यमात ऐकू येते. हे संस्था उजव्या विचारसरणीची आहे वगैरे. आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात. युवा नेते राहुल गांधी हे तर या संस्थेला देशविघातक शक्तीच म्हणतात. समाजाच्या एका भागात या संस्थी विषयी नक्कीच भीती आहे. मला माझ्या काही मित्रांनी या सम्स्थेच्या कारवायांबद्दल टोकाची मते मांडली. त्यात कदाचित अफवाही असतील. त्यामुळे मी अजूनच गोंधळून गेलो आहे. मिपावासियांना या संस्थेविषयी काय वाटते हे समजून घेण्यासाठी हा काथ्याकूट मांडतो आहे. १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का? २. ही एक अतिरेकी संस्था आहे? ३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही? ४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? ५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते?

वाचने 20515
प्रतिक्रिया 115

प्रतिक्रिया

ह्म्म. सुट्टीवर आहात काय ?

In reply to by आनंदयात्री

संस्थेची काही माहिती असेल तर द्या. त्याबद्दल काही बोलत असाल तर बोला. (माझ्या सुट्टीचे पाहायला खुदा आहे. काळजी नसावी.)

In reply to by आंसमा शख्स

>>संस्थेची काही माहिती असेल तर द्या. त्याबद्दल काही बोलत असाल तर बोला. हो का ? आंसमा शख्स असे नाव घेतल्याने संघिष्ट लोक तुम्हाला मुस्लिम समजणार आणि तुमच्यावर तुटुन पडणार असे वाटते का तुम्हाला ? असे असेल तर ऑम्लेट घ्या साहेब, हवा तर चहा ही घ्या जाता जाता !! आमच्या कानावर बिड्या दिसतात का ? तुमचा मुद्दाम भडक चर्चा घडवुन आणायचा उद्देश्य आम्हाला कळत नाही असे वाटले का ? गेट वेल सुन. संपादक मंडळाने अश्या उठसुठ निघणार्‍या वादग्रस्त विषयांवरच्या धाग्यांना आवर घालावा ही विनंती.

मिपाकरांचे मत जाणून घेण्या आधी या संघटनेबद्दल तुमचे मत काय आहे हे स्पष्ट सांगावे. अभिज्ञ.

In reply to by आंसमा शख्स

माझे मत चांगले नाही असे मला पूर्णपणे म्हणता येत नाही. मी गोंधळलेलो आहे. खरे की काय? मग हे वाचा. तुम्हीच लिहिलेले आहे. हे काय चांगल्या मताने लिहलय काय? आर एसेस म्हणजे माहिती तपासून घेतली पाहिजे हेच खरे. ते काय सांगतील याचा भरवसा नाही. कधी कधी तर ते मला ख्रिश्चनांचेच एजंट वाटतात. - माझे वैयक्तिक मत आहे. फु़कट कशाला लोकांचा वेळ वाया घालवताय राव. संघाकडे धर्मविद्वेषी चष्म्यातुन पाहणे सोडुन द्या. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना त्यांचा धर्म, संस्कृती, स़स्कारांची शिकवण देणारी संस्था आहे ती. अनेक घरांतुन मुलांना संघाच्या शिबिरांना पाठवणे आवश्यक समजतात. गावागावातुन संघाचे संस्कार वर्ग भरतात. आपणही आपल्या मुलांना या संस्कार शिबिरात पाठवुन बघा. वाटल्यास त्यांनी हिंदु देवतांच्या प्रार्थना नाही म्हटल्या तरी चालतील. पण बाकी ज्या गोष्टी शिकायला मिळतील त्यामुळे त्याचे भलेच होइल आणी पर्यायाने समाजाचेही. तोच तुम्हाला सांगेल मग संघ चांगला की वाईट ते. हो आणि संघाच्या शिबिरांतुन लहान मुलांना कुठलेही धर्मद्वेषाची बाळकडु मिळत नाही.

आम्हाला काय वाटतं ते जाउद्या, प.पु.राहुल बाबा याबद्दल काय म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे

आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती अशी महान व्यक्ती जर संघाला एक भयानक संस्था म्हणत असेल तर ते निर्विवाद सत्य असलं पाहिजे.

आताशा मिपावर ब-याच भिती बद्दलचे धागे यायला लागलेत, एखादा मानसोपचार तज्ञ आहे काय मिपावर जो समुपदेशन करु शकेल सगळ्यांना, आंतरजालीय समुपदेशन वैग्रे. आम्हाला तर प्रसारमाध्यामातुन मुन्नी आणि शिला नंतर जलेबीबाई ऐकु येते, मध्ये मध्ये दिल्ली बेलीचे ट्यं ट्यं असे बुच मारलेले संवाद ऐकु येतात. मग कार्स २ चे मस्त मस्त आवाज, अजुन लिटिल चॅम्प्स च्या पोरांनी म्हणलेली गाणी, मी मराठी वरचा नियाज का रियाज शेख, आमचा गाववाला, लई भारी गाणी म्हणतो, एकदा त्यानं त्या फुलांच्या गंधकोषी लई भारी म्हणलं होतं, खास कव्वाली स्टाईलनं. असलं काहीतरी बघत ऐकत जा की, कशाला उगा नको त्या लोकांच्या बडबडीकडे लक्ष देता आहात ?

माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती.... :) :) :) :) :) :) बरं ते जाऊ दे.. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? अजिबात झगमगाट न करता, आवाज न करता आरेसेसचे लोक आदिवासी शिक्षण / अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांच्या मुलांचे शिक्षण आणि अशा अनेक कामांना झोकून देऊन करत असतात. हिंदुत्त्वाबाबत त्यांची मते अतिरेकी असली तरी या समाजकार्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. वीस वर्षापूर्वी दिलेल्या देणगीतून शिक्षण केल्या गेलेल्या मुलांचे अहवाल आणि प्रगतिपुस्तके दरवर्षी आम्हास येतात. आरेसेसच्या हिंदुत्ववादाशी माझे कितीही मतभेद असले तरी अशा कामांसाठी दिलेल्या पैशातली चवन्नीही हडप होणार नाही याची खात्री असलेल्या दुर्मिळ चोख प्रामाणिक संस्थांपैकी ती आहे. माहिती नाही म्हणून दिली.

In reply to by गवि

गवि, आर एस एस या नावाखाली संघ कधीच सेवाकार्य करीत नाही. संघाची भुमिका 'संघ काही करणार नाही, होईल' अशी असल्याने संघाचे स्वयंसेवक विविध संस्थांतून आपापले कार्य करत असतात. वनवासी कल्याण आश्रम, मजदूर संघ, बजरंग दल, विहिंप, जन्मभूमी न्यास, विविध सहकारी बँका, महत्त्वाचे म्हणजे राजकारणात भाजप सारख्या संघाच्या बर्‍याच शाखा आहेत. (ध्वज प्रणाम -शाखा वेगळी आणि ह्या शाखा वेगळ्या ;) ) अधिक प्रकाश 'जाणकार' टाकतील. संघ विकीर.... १-२-३. अरे हो, दिग्विजय सिंग आणि राहुल गांधी कोण?

In reply to by गवि

कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? - हे वाचून वाईट वाटले. का माहित नाही . हा धागा वाचल्यापासून या प्रश्णावर काय उत्तर द्यावे याचा विचार करुत होतो. मात्र गगनविहारी साहेब, आपण खुप छान समर्पक्,योग्य, खरे उत्तर दिलेत . धन्यवाद :) अमोल केळकर

In reply to by गवि

गगनविहारी आणि रणजित चितळे धन्यवाद. मला वाटते की आपण समर्पक उत्तर दिले आहे. आपल्या उत्तरांमुळे आणि इतरांच्याही उत्तरांमुळे महत्त्वाची वेगळी बाजूही समजली याबद्दल धन्यवाद. आशा आहे चर्चा सकारात्मक रितीने पुढे जाईल. खुदाच्या कृपेने वाचत आहे.

श्री. आंसमा शख्स हे सध्या मिपावार रोज धाग्यांचा रतिब घालत आहेत. त्या धाग्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारले अथवा लेखना संदर्भात शंका उपस्थित केली की मात्र ते सरळ पळ काढतात अथवा उडवीउडवीची उत्तरे देतात. संपादक मंडळ अशा तकलादू , बिनबुडाच्या व केवळ केवळ आणि विद्वेष पसरवणार्‍या लेखनाची दखल घेऊन संबंधितांना योग्य ती समज देईल काय ? अन्यथा दुर्लक्षित पॅंथरला या प्रकरणात जातीने लक्ष घालावे लागेल ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

फक्त ३ धागे आहेत या आठवड्यातले. तो कराराचा धागा जुना आहे. मी सर्व शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो कराराचा धागा वर आला आहे. मी कुठेही पळ काढलेला नाही किंवा ऊडवा उडवीही केलेली नाही. तसेच मी कोणतेही विद्वेष पसरवणारे लेखन करत नाही. उलट विद्वेष पसरवणार्‍या गोष्टींना आळा कसा घालता येईल हे पाहतो आहे. यात काही वावगे मला दिसत नाही. उदा. वल्ड विजन ची ख्रिस्ती धर्मप्रचार हेच प्रमुख काम आहे हे तत्त्व आहे. हे त्यांनीच दिली आहेत मी ती फक्त येथे मराठीत मांडली. आरेसेस या संस्थेविषयीची मते मी मांडलेली नसून अनेक मान्यवर मंडळींनी मांडलेली आहेत. मी ती फक्त येथे दिली आहेत. जर तुम्हाला ते मत पटत नसेल तर खंडन करा. तुम्ही खंडन न करता गळे काढत आहात याचा अर्थ त्या आरोपात तथ्य असले पाहिजे. आग नही तो धुंआ क्यो है साहब?

In reply to by आंसमा शख्स

तुम्ही थोडे गुगलून पाहाल तर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघा बद्दल पुष्कळ माहिती मिळेल त्यांचे सेवादर्शन म्हणून संकेत स्थळ आहे तिथे तुम्हाला त्यांच्या कार्या बद्दल माहिती मिळेल किती विविध प्रकल्प ते राबवतात हे कळेल. http://www.sevadarshan.org/ मी पण जमेल तेव्हा सेवा भारतीतून काम केले आहे हे इथे सांगण्याचा एकच मुद्दा "अफवाओ पे मत जाओ अपनी अकल लागाओ"

In reply to by आंसमा शख्स

आरेसेस या संस्थेविषयीची मते मी मांडलेली नसून अनेक मान्यवर मंडळींनी मांडलेली आहेत. मी ती फक्त येथे दिली आहेत मान्यवर म्हणजे राहुलबाबा गांधी आणि दिग्विजय सिंग हे आहेत? ख्रिश्चन झाले, हिंदू झाले भयंकर अतिरेकी लोक आहेत. मुसलमानांबद्दल तुमचे काय मत आहे? नाही म्हणजे जगात सगळीचकडे रक्तपात करणे (जिहादच्या नावाखाली - धर्माच्या नावाखाली) वगैरे वगैरे बद्दल बदनाम आहेत म्हणून विचारलं. लोकं काय हो काहीही बोलतात. इतर धर्मीय अतिरेक्यांनी असे काम करून मुसलमानांचे नाव पुढे केले असण्याची दाट शक्यता आहे. नाही का? अगदी सालस, सहिष्णू वगैरे धर्म आहे तो. आता केवळ मुसलमान धर्म स्वीकारला नाही म्हणून गावेच्या गावे कापली त्या पैगंबराने त्याला त्याचा नाईलाजच होता.

In reply to by आंसमा शख्स

तो कराराचा धागा जुना आहे.मी सर्व शंकांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो कराराचा धागा वर आला आहे. मिपाकर त्या धाग्यावरील प्रतिसादांवरचे तारीख आणि वेळ बघून ही खात्री करून घेऊ शकतात की मी उपस्थित केलेल्या हरकतींना (शंकांना नव्हे!!) आंसमां शख्स यांनी उत्तर न दिल्यामुळे मी जेंव्हा पाठपुरावा केला तेव्हाच तो धागा वर आला, त्यांनी शंकांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नव्हे.... त्यांनी त्या धाग्यात केलेली बिनपुराव्याची आणि प्रक्षोभक विधाने बिनशर्त मागे घेतल्याने तो वाद माझ्यापुरता संपला आहे. बाकी चालू द्या....

In reply to by आंसमा शख्स

मी कुठेही पळ काढलेला नाही किंवा ऊडवा उडवीही केलेली नाही.
खोटे बोल पण रेकुन बोल :) 'निरागस चेहर्‍याआडचे धर्मांतर' ह्या तुमच्या धाग्यात मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अजुन तुम्ही दिलेले नाहीत. तसेच पियुशाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर / खुलासा देखील आपण दिलेला नाहित. शोधले तर असे अनेक प्रश्न सापडतील जे आपण सरळ दुर्लक्षित केलेले आहेत. तुमचे लिखाण हे केवळ केवळ आणि केवळ दोन समजान तेढ निर्माण व्हावी, वाद व्हावेत तसेच ह्या न त्या कारणानी मिपावर धुराळा उडावा ह्या आणि ह्याच हेतुन केलेल आहे हे स्पष्ट आहे. आपली अनेक प्रक्षोभक विधाने संपादित करण्याची वेळ तुमच्यावर आली ह्यातच सर्व काही स्पष्ट होते. तेंव्हा आता कृपया हे धंदे थांबवा. जोडता येत नसेल तर निदान तोडण्याचे काम करु नका.

In reply to by परिकथेतील राजकुमार

कोणीही चुX ने उठाव आणि काही आभ्यास न करता कितीही धागे काढावेत अस इथे व्हायला लागलाय ? स. म. ने ताबडतोब लक्ष घालावे अशी जनहित याचीया मी दायर (?) करतो :)

In reply to by माझीही शॅम्पेन

असाच धागा विनायक पाचलग उर्फ कोदा ह्यांनी काढला होता :) पुढे त्याचे काय झाले ते सगळे जाणतातच. तसा दंगा पुन्हा व्हायच्या आत संपादक मंडळाने कार्यवाही / कारवाई करावी अशी अपेक्षा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फक्त तो धागा काढताना संघाबाबत अतीव आदर व प्रेम होते एवढाच काय तो फरक ... मी आणि माझे कुटुंबीय संघाशी संबंधीत आहेत ,व सक्रीय नसले तरी संघप्रेमी आहेत . याचा मला सार्थ अभिमान आहे ... बाकी गेल्या २.५ वर्षात कोणत्या धाग्याना फाट्यावर मारायचे हे चांगलेच शिकलो आहे, त्यातलाच हा एक धागा .... जाता जाता - समतोल दिग्विजय सिंग "आवरा .."वर टाकायला पाहिजे हे स्टेटमेंट ...:)

In reply to by विनायक पाचलग

फक्त तो धागा काढताना संघाबाबत अतीव आदर व प्रेम होते एवढाच काय तो फरक ... मी आणि माझे कुटुंबीय संघाशी संबंधीत आहेत ,व सक्रीय नसले तरी संघप्रेमी आहेत . याचा मला सार्थ अभिमान आहे ...
असं असूनही लोक उगाच 'साधना' (साप्ताहिक) समाजवादी आहे असं का म्हणतात, हे कळतच नाही मला तरी. 'साधना' किती डायनॅमिक आहे याची ही खणखणीत नोंद आहे. ;)

In reply to by श्रावण मोडक

असं असूनही लोक उगाच 'साधना' (साप्ताहिक) समाजवादी आहे असं का म्हणतात, हे कळतच नाही मला तरी. 'साधना' किती डायनॅमिक आहे याची ही खणखणीत नोंद आहे.
अगदी अगदी ..याचे श्रेय मात्र विनोद शिरसाठ या व्यक्तीला जाते ,एवढे मात्र नक्की ..

मतं पट्त नाहीत पण सिद्ध करण्याची वांझोटी मेहेनत का करायची. आणि तुम्ही उल्लेख केलेल्या "अनेक मान्यवर" मंडळींनी देखील त्यांचे विधान सिद्ध केले आहे का????? आणि तुम्ही म्हणल्या प्रमाणे त्या आरोपात जर तथ्य असेल तर तुम्ही सिद्ध करा

राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात
या धाग्याचा जीव वरील वाक्यातच संपला....त्यामुळे पुढील लिखाण वाचू शकलो नाही ! क्षमस्व

मी लहान होतो तेव्हा पासून आर एस एस च्या शाखेत जायचो. एक तासाच्या ह्या शाखेत व्यायाम, सुर्यनमस्कार, सांघिक खेळ व्हायचे. नंतर एक शिवाजीची किंवा पृथ्वीराज चौहान, झाशीची राणी इत्यादींच्या कथा व्हायच्या. कधी कधी संस्कारांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायचे. (शिव खेरा च्या यु कॅन विन हे पुस्तक आत्ता आले आहे त्यातल्या गोष्टी आम्ही खुप पुर्वी शाखेत ऎकल्या होत्या). शेवटी नसस्ते सदा वत्सले अशी प्रार्थना व्हायची. कधीही कोणा बद्दल वाईट शिकवले नाही. राष्ट्रसेवा करण्या साठी नेहमीच प्रोत्साहन दिले. माझ्या मनात राष्ट्राबद्दल जे चांगले विचार येतात ते शाखेतील शिकवणी मुळे. काम काय करते असे विचाराल तर राष्ट्रप्रेम वाढवते मुलांमध्ये. बाकी गगनविहारीनी लिहीले त्याला सहमती.

In reply to by रणजित चितळे

क्या बात है !! :) संपुर्ण प्रतिसाद आवडला (शिव खेरा च्या यु कॅन विन हे पुस्तक आत्ता आले आहे त्यातल्या गोष्टी आम्ही खुप पुर्वी शाखेत ऎकल्या होत्या). हे विशेष आवडले अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

मी प्रताप सायम मध्ये जायचो. मला कधीही आठवत नाही कोणाबद्दल वा कोणत्याही समाजा बद्दल अपशब्द बोललेला. ऎकलेला शाखेमध्ये. रविवारी शंभर सुर्यनमस्कारांची कावड लागायची. शिबिरातून सुद्धा तसेच. गृप डिस्कशनचे पहिले धडे तेथेच शिकलो. वक्तशिरपणा तेथेच शिकलो. एका तासात होलसम व्यायम व बौधिक कोठे मिळणार नाही शाखा सोडून (फुकटात) असे मला वाटते.

In reply to by रणजित चितळे

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.. ... मंत्र छोटा तंत्र सोपे, परि यशस्वी ठरले ते. ... अशी खूप गाणी.. संघाची शिस्त तोंडात बोटे घालण्यासारखी असायची. आर्मीसारखीच. लाखोंचा मेळावा असला तरी बसा म्हटले की शिस्तीत बसणार. कुठे गोंधळ नाही की तुडवातुडवी नाही. मुख्य म्हणजे कोणालाही वैयक्तिक पदाची किंवा पैशाची/सत्तेची हाव नाही. आयुष्यभर फक्त कर्तव्यभावनेने शाखा चालवणारे/तिथे येऊन शिकवणारे अनेक आजोबा पाहिले. (कोणत्याही "पदा"वर नसतानाही) चितळेसाहेब, लहानपणीची पहाटेची ती रम्य शाखा आठवून दिलीत.. धन्यवाद. आम्हाला मात्र कराची किसकी है किंवा तत्सम म्हटले तर राष्ट्रप्रेमी पण म्हटले तर पाकिस्तानद्वेषाने-आणि पर्यायाने मुस्लिमद्वेषाने भरलेले असे खेळ शिकवायचे. इथे सरळसरळ हिंदुत्ववाद चालतो आणि ती धार्मिक संघटना आहे हे नाकबूल करताच येणार नाही. त्यांच्या अशा दर्शनाने उबग येऊन कळायला लागल्यावर मी तिथून बाहेर निघालो.. फक्त त्यांची एक अतिशय प्रामाणिक सचोटीची शिस्तबद्ध बाजूही आहे हे सांगायचे होते.

In reply to by गवि

इथे सरळसरळ हिंदुत्ववाद चालतो आणि ती धार्मिक संघटना आहे हे नाकबूल करताच येणार नाही.
गवि ह्यात काही गैर आहे काय ? अनेक मदरशांमध्ये जे चालते ते वेगळे काय असते ? :)
त्यांच्या अशा दर्शनाने उबग येऊन कळायला लागल्यावर मी तिथून बाहेर निघालो..
हळुहळु तुम्ही हुच्चभ्रु होणार म्हणा की ;) विनोदाचा भाग सोडा, पण एखाद्या आपत्तीच्या वेळेला जात - पात अथवा धर्म बघुन संघाने त्या त्या आपदग्रस्त भागात काम केल्याचे मी आजवर तरी कधीच, अगदी संघद्वेष्ट्यांकडून देखील ऐकलेले नाही. गविंना नक्की कसले दर्शन झाले आणि कशाचा उबग आला हे जाणुन घ्यायला खरच आवडेल.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मुख्य म्हणजे ज्या वयात पोरांना मुस्लिम / हिंदू / पाकिस्तान यातले काही म्हणता काही माहीतही नसते त्या वयात त्यांच्या मनात पूर्वग्रह भरण्याचे काम मला नाही आवडले. मोठे होऊन पाहून आपापले मत बनवले तर ठीक. हा लोकल प्रॉब्लेम असणार. देशभरातली प्रत्येक शाखा अशीच असेल असे मुळीच म्हणणे नाही. तिथे शिकवताना खचितच मुस्लिमांचा उल्लेख जनरलाईझ्ड वाईट तर्‍हेने केला जायचा. मी तपशील देऊ शकत नाही. क्षमस्व. वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी अजूनही संघाला सपोर्ट करतो, पण त्यातल्या समाजकार्यासाठी आणि प्रामाणिकपणासाठी. द्वेष पसरवणे सर्वांनीच थांबवायला पाहिजे. उच्चभ्रू ठरण्याच्या भीतीने मी अशा गोष्टीला सबस्क्राईब करु शकत नाही.

In reply to by गवि

मुख्य म्हणजे ज्या वयात पोरांना मुस्लिम / हिंदू / पाकिस्तान यातले काही म्हणता काही माहीतही नसते त्या वयात त्यांच्या मनात पूर्वग्रह भरण्याचे काम मला नाही आवडले. मोठे होऊन पाहून आपापले मत बनवले तर ठीक.
मी तेच म्हणतोय गवि. हे फक्त संघाच्या शाखांमध्येच चालते काय ? किंवा फक्त हिंदूनाच अशी शिकवण दिली जाते काय ? आणी खरा इतिहास सांगण्यात गैर ते कय? पुढे जाउन ह्या मुलांना सरकारने ठरवलेला आणि लिहून घेतलेलाच इतिहास शिकायला मिळणार असतो ना.
तिथे शिकवताना खचितच मुस्लिमांचा उल्लेख जनरलाईझ्ड वाईट तर्‍हेने केला जायचा. मी तपशील देऊ शकत नाही. क्षमस्व.
पुन्हा वर आहे तेच म्हणतो.
मी अजूनही संघाला सपोर्ट करतो, पण त्यातल्या समाजकार्यासाठी आणि प्रामाणिकपणासाठी.
विषयच संपला. आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका कारणासाठी सरळ सरळ जनरलायझेशन करु नका. एका छोट्याश्या कारणासाठी संपूर्ण संघाच्या कार्यावरच बोळा फिरवण्यासारखे झाले हे. (च्यायला ह्या गविंशी चर्चा तर चालु केली आहे, पण त्यांच्यांकडे टंचनिका आहे आणि आम्ही आपले स्वतःच किबोर्ड बडवणार.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्ही तेच म्हणतोय की केवळ एका कारणासाठी सरळ सरळ जनरलायझेशन करु नका. मान्य.. .............. (बाकी पांढर्‍यातल्याचे उत्तर देता येत नाही कारण ते पांढर्‍यातच दिले पाहिजे.. आणि शिंचे काहीपण करा, अक्षरांना पांढरा रंग देताच येत नाहीये. काही सदस्यांनाच आहे का ही सोय? ;) )

In reply to by गवि

बाकी पांढर्‍यातल्याचे उत्तर देता येत नाही कारण ते पांढर्‍यातच दिले पाहिजे.. आणि शिंचे काहीपण करा, अक्षरांना पांढरा रंग देताच येत नाहीये. काही सदस्यांनाच आहे का ही सोय?
अक्षरांना पांढरा रंग सिलेक्ट केल्यानंतर, प्रतिक्रियेच्या बॉक्स खाली असलेल्या input format वर क्लिक करुन Full HTML हा ऑप्शन सिलेक्ट करा. झाले काम ;) आजकाल खरडी आलेल्या कळत नाहित त्यामुळे इथेच प्रतिसाद दिला आहे.

तुम्ही धागा सुरु करण्यापूर्वी मत बनवला आहे का?? पुर्व ग्रह दुषित नजरेने बघु नका !!

आज राष्ट्रीय नेते माननीय दिग्विजय सिंग यांच्यासारखी समतोल व्यक्ती सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बुद्धीभेद करणारी एक भयानक संस्था आहे असे म्हणतात हा शख्स गंभीरपणे लेख लिहितो आहे की खेचतो आहे इथल्या सगळ्यांची. साला एवढा वेळ मला हा लेख गंभीरपणे लिहिला आहे असे वाटत होते. पण हे वाक्य परत वाचल्यावर हास्याची चिळकांडी उडली ना राव. साला हे म्हणजे सीताराम केसरी आणि लालूप्रसाद यादवला प्रामाणिक आहेत किंवा ओसामा बिन लादेन आणि दाउद पापभीरु आहेत किंवा अझहर आणि जडेजा सच्चे क्रिकेटखेळाडु आहेत किंवा माधुरी गुप्ता आणि हुरियतचा गिलानी देशप्रेमी आहेत असे म्हटल्यासारखे वाटते आहे. चंमतग आहे सगळी.

In reply to by मृत्युन्जय

खरेच चंमतग आहे. मायला दिग्विजय सिंग राष्ट्रीय नेता कधीपासून झाला? राहुल बाबा नी हाकलला तर काँग्रेसमधलेच काय पण एकूणच राजकीय जिवन संपून जायील त्याचे. असो. विषयांतर नको. संघ आणि संघाचे कार्य या दोन्ही गोष्टी समजायला प्रत्यक्ष अनुभव आणि जाणून घेण्याची वृत्ती असावी लागते. बाकी चालू द्या!!

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

राहुल बाबा नी हाकलला तर काँग्रेसमधलेच काय पण एकूणच राजकीय जिवन संपून जायील त्याचे
तरीच काल दुरदर्शनवर म्हणताना पाहिलं की "मनमोहन अतिशय चांगले पंतप्रधान आहेत. पण मला माझ्या हयातीत (गचकायच्या आधी) राहुल(जीं(?))ना पंतप्रधान झालेलं पहायला आवडेल."

गंमतीदार लेख. रास्वसं वर टीका किंवा आक्षेप घेतल्याचा भास होईल अशा रीतीने लेख लिहिला आहे. परंतु तो एका संघीयानेच विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया याव्यात अशा उद्देशानेच लिहिला आहे. लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता लोकांनी संघाच्या बाजूने तुटून पडावे असा उद्देश स्पष्ट दिसतो. लेखात विचारलेले प्रश्न अगदी नेव्ह (Naive) सारखे विचारले आहेत. परंतु त्यांची काय उत्तरे अपेक्षित आहेत हे प्रश्नातूनच स्पष्ट होते. प्रस्तुत लेखकाने नुकतेच काढलेले ख्रिश्चन धर्मांतराविषयी काढलेले धागे पाहता ते संघीय असल्याबाबत कसलाच संशय उरत नाही.

In reply to by नितिन थत्ते

लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता म्हणजे काय म्हणायचे आहे तुम्हाला नक्की थत्ते चाचा? दिग्विजय सिंग समतोल विचाराचे नाहीत असे तर नाही ना म्हणायचे तुम्हाला? आणि राहुल गांधी युवा नेते नाहीत असे का म्हणायचे आहे तुम्हाला? ;)

In reply to by मृत्युन्जय

दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांना सतत चर्चेत ठेवण्याचे काम हे छुपे संघीयच करतात असे वाटते. अशा गोष्टीचा इंदिरा गांधींना पुनरागमनात खूप फायदा झाला अशी चर्चा आठवते.

In reply to by नितिन थत्ते

>>प्रस्तुत लेखकाने नुकतेच काढलेले ख्रिश्चन धर्मांतराविषयी काढलेले धागे पाहता ते संघीय असल्याबाबत कसलाच संशय उरत नाही.>> सहमत , बरोब्बर ओळ्खलत तुम्ही! अगदि हेच लिहणार होतो. संघाची हिच खासियत आहे , आपल्याला जे म्हणायच असत ते लोकांकडुन म्हणुन घ्यायच (ही चाल फक्त नितीन थत्ते जींनाच आधी कळल्या मुळे ते ही छुपे संघीय असावेत असा संशय येतो आहे) --उघड संघीय आनंद

In reply to by आनंद

ही चाल फक्त नितीन थत्ते जींनाच आधी कळल्या मुळे ते ही छुपे संघीय असावेत असा संशय येतो आहे
नितीन थत्ते = जींना ?? अरे रे ;) परा नेहरू

In reply to by नितिन थत्ते

रास्वसं वर टीका किंवा आक्षेप घेतल्याचा भास होईल अशा रीतीने लेख लिहिला आहे. परंतु तो एका संघीयानेच विशिष्ट प्रकारच्या प्रतिक्रिया याव्यात अशा उद्देशानेच लिहिला आहे. लेखात वापरलेली दिग्विजयसिंग आणि राहुल गांधी यांची वर्णने पाहता लोकांनी संघाच्या बाजूने तुटून पडावे असा उद्देश स्पष्ट दिसतो. तुमचेच हे वाक्य वाचून तुम्हीदेखील संघाचेच कार्यकर्ते आहात असे वाटू लागले आहे. :) बाकी हे आसमां शख्स नावाने लिहिलेले लिखाण अदखलपात्र आहे याची खात्री पटत चालली आहे.

कोणी चांगले काम या देशासाठी करु लागले की जे भ्रष्टाचारी, दुराचारी आहेत त्यांना त्याची भीति वाटू लागते आणि मग ते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्याविषयी अफवा पसरवतात, लोकांना त्यांची भीति घालतात. काँग्रेसने अनेक वर्षांत हेच चालवले आहे. आरएसएसची सगळी मते पटण्यासारखी नसल्याने मीही लहानपणीच शाखेतून बाहेर पडलो. पण त्यांच्या सच्चा देशप्रेमाबद्दल मला कधीही शंका येणार नाही. आणि अशा संघटनेला देशद्रोही ठरवून त्यांना संपवायला निघालेलेच एक दिवस या देशातून संपलेले असतील.

या धाग्यावर मधून मधून कमर्शियल ब्रेक आहे. मी सध्या येथे मक्याची भाजलेली कणसे विकण्याचे काम करत आहे. तस्मात् प्रतिसाद द्यायला वेळ नाही. आता आमची जाहिरात ऐका. उखाळ्या पाखाळ्या काढणारी माणसं भिडणारी, चिडणारी, रडणारी माणसं जेव्हा श्रमतात आणि दमतात तेव्हा आवडीने खातात 'पांडू'ची कणसं कणीस म्हणा वा भुट्टा! करा क्षणात चट्टामट्टा... सुप्रसिद्ध 'पांडू' कणीस. खाल तर आवडाल शंभरजणींस.. :) ........................................................... (अवांतर : लहान मुलांचे एक गाणे आठवले.) दिग्गू जोकर, राणीचा नोकर राणी मारते छमछम छड्या दिग्गू मारतो टुणटुण उड्या

In reply to by योगप्रभू

कमर्शिअल अंमळ अश्लिल वाटली. तसेच कणीस भाजलेले आहे, उकडलेले आहे की तसेच आहे ह्याचा फटू नसल्याने फसवणुकीची शक्यता डोकावते आहे. मुख्य मुद्दा म्हणजे पांडू हा हिंदू / मुस्लिम / ख्रिश्चन नक्की कोण आहे ? इथलाच आहे का परप्रांतीय आहे ? संघवाला आहे का द्वेष्टा आहे ? ह्याची माहिती मिळत नाही. स्वयंघोषित सेंसॉर परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ कमीत कमी त्याने अर्धि खाकी चड्डी घाली आहे की नाही हा क्लु तरी द्या :)

In reply to by माझीही शॅम्पेन

>>>अर्धि खाकी चड्डी संघात हा बदल कधीपासून झाला? खाकी चड्डी घालत होते हे ठाऊक होते. 'अर्धि खाकी चड्डी' म्हणजे अम्मळ अश्लिल झालं की वो.... (विन्ग्रजीचे मराठीकरण असे चुकीचे नका करु हो)

In reply to by माझीही शॅम्पेन

लहान मुलांच्या गाण्यात 'चड्डी' चालते, मग त्याला अश्लील म्हणावे का? जंगल जंगल पता चला है चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है. पूर्वी चरणसिंग आणि रेड्डी यांनी स्थापन केलेल्या काँग्रेसला लोक 'चड्डी काँग्रेस' म्हणत असत. :)

In reply to by माझीही शॅम्पेन

चड्डी हा शब्दच 'हाफपॅण्ट' दर्शवतो असा माझा समज होता. जो बरोबरही असावा. त्यामुळे चड्डी अर्धि करणे अश्लिल सदरात मोडते. बाकी आपण आपली शिकवणी कामवाल्या बाईकडे लावली असल्याने आपले शिक्षण अशा प्रकारे झाले असल्यास आमचा प्रत्यवाय नाही.

In reply to by प्यारे१

आपली शिकवणी कामवाल्या बाईकडे लावली असल्याने आपले शिक्षण अशा प्रकारे झाले असल्यास आमचा प्रत्यवाय नाही.
वैय्यतीक वाइड बॉल ! सोडला ! तुमचा चालू द्या !

In reply to by परिकथेतील राजकुमार

मी येथे मक्याची भाजलेली कणसे विकत आहे, इतके स्पष्ट सांगुनही लोक पुन्हा कणीस उकडलेले आहे, की कसे, हा प्रश्न का विचारताहेत? बहुधा आमच्या गिर्‍हाईकांचा बुद्धिभ्रम करायचा डाव दिसतोय. हम्म.. सावध राहायला हवं या जाहिरातीत अंमळ अश्लील काही नाही. उलट ती निर्मळ ससलील आहे. (ससलील म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी) खुलासा : सुप्रसिद्ध 'पांडू' कणीसचे चालक पांडू हे कॉमन मॅन आहेत. त्यांचा कोणत्याही विचारसरणीशी/प्रांतीयवादाशी संबंध नाही, याची सेन्सॉर बोर्डाने नोंद घ्यावी. 'पांडू' यांचे बंधू 'बंडू' यांच्याबाबत जनमानसात काही समज असल्यास त्याचे निराकरण करण्यास हा उद्योगसमूह बांधील नाही. सार्वजनिक माहितीस्तव प्रसृत झबूराव हंचाटे, मुख्य जाहिरात व जनसंपर्क अधिकारी, 'पांडू' उद्योगसमूह

In reply to by योगप्रभू

मी येथे मक्याची भाजलेली कणसे विकत आहे, इतके स्पष्ट सांगुनही लोक पुन्हा कणीस उकडलेले आहे, की कसे, हा प्रश्न का विचारताहेत? बहुधा आमच्या गिर्‍हाईकांचा बुद्धिभ्रम करायचा डाव दिसतोय. हम्म.. सावध राहायला हवं
काही लोक ताजमहाल म्हणजे पूर्वी तेजोमहल का काय ते मंदिर होते असे सांगत असतात. ते सांगतात म्हणुन विश्वास का ठेवावा ? पुरावा ? काही फटू वैग्रे ?
या जाहिरातीत अंमळ अश्लील काही नाही. उलट ती निर्मळ ससलील आहे. (ससलील म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी)
ज्या ज्या जाहिरातीत बाई नसते त्या सगळ्या जाहिराती अश्लील असतात ह्याची नोंद घेतल्या जावी.
खुलासा : सुप्रसिद्ध 'पांडू' कणीसचे चालक पांडू हे कॉमन मॅन आहेत. त्यांचा कोणत्याही विचारसरणीशी/प्रांतीयवादाशी संबंध नाही, याची सेन्सॉर बोर्डाने नोंद घ्यावी. 'पांडू' यांचे बंधू 'बंडू' यांच्याबाबत जनमानसात काही समज असल्यास त्याचे निराकरण करण्यास हा उद्योगसमूह बांधील नाही.
ओह्ह्ह ! निधर्मीवादी काय तुम्ही ? बर्र बर्र! साला ह्या दंगलीत पहिला रॉकेलचा बोळा तुमच्याच स्टॉलवर बघा.

In reply to by योगप्रभू

कणसं पांडूचीच का ?? अकबर किंवा अ‍ॅन्थोनीची का नाहीत ?? आणि शंभरजणींस आवडण्यासाठी कुणा एकाने का खायचं शंभरजणांस आवडण्यासाठी कुणा एकीने का खाऊ नये ?? ;) ह. घ्या हो. टीपः प्रश्नचिन्हानंतर 'आणि' लिहीलंय म्हणून कुणी हरकत घेऊ नका ब्वॉ.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ही एक राष्ट्रविघातक संस्था आहे का? तसे अजिबात वाटत नाही. उलट ही संस्था बरीच सार्वजनीक कामे करते. उदा: पुरग्रस्ताना मदत वगैरे. या संस्थेचे लागेबांधे विशेशी भाडोत्री अतीरेकी संस्थांशी आहेत असे देखील नाही. आर एस एस जे अराजकीय्काम करते ते खरेच मोलाचे आहे. २. ही एक अतिरेकी संस्था आहे? त्या संस्थेतील काही लोकांचे विचार प्रखर आहेत. पण प्रखर विचार म्हणजे अतिरेकी नव्हेत. सिमी वगैरे सारखे या संस्थेतील लोकांचे पाकिस्तानशी लागेबांधे नाहीत. तसेच ही संस्था आय एस आय च्या पैशांवर पोसली जात नाही. शिवाय ही संस्था शिक्षण संस्था या नावाखाली मदरशात जहाल वादाचे शिक्षण देत नाही ३. इतक्या भयंकर संस्थेवर बंदी का घातली जात नाही? ही संस्था भयंकर आहे असे काही तुम्हाला सापडले आहे का? ही संस्था कार्यकर्त्याना धर्मांध माथेफिरु बनवण्याचे शिक्षण देत नाही. काही तत्वे धोरणे चुकीची असतील पण त्यामुळे आर एस एस भयंकर आहे हे पटत नाही ४. कोणते काम ही संस्था करते? काही काम खरच करते का? पूरग्रस्ताना मदत वैगेरे बाबत अनुभव आहे. या सम्स्थेला दिलेली मदत ही लाभार्त्यांपर्यन्त पोहोचते हे खात्रीलायक सत्य आहे ५. तुम्हाला या संस्थे विषयी काय वाटते? फार प्रेम नाही कारण संस्था चांगली आहे. विचारधारा देखील चांगली आहे. पण काही तत्वे पटत नाहीत, अर्थात त्यावरून या संस्थेला अतिरेकी म्हणणे चूक आहे. धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे. जी संस्था कट्टर देशप्रेमी माणसे घडवते त्यांच्या देशनिष्ठेबद्दल कोणीही आक्षेप घेवू शकणार नाही. मात्र जे लोक मातृभूमीचे वम्दन गान गाऊ शकत नाहीत त्याबात काय बोलावे.?

In reply to by विजुभाऊ

>>>धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे. ठळक केलेले (विशेषतः अधोरेखित) समजले नाही. कृपया इस्कटून सांगावे.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ, चांगले आणि उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद! धर्माचा आग्रह धरणे हे चूक नाही पण धर्माचा आग्रह धरत कोणतीच बांधीलकी न मानणे हे चूक आहे. हे वाक्य फार महत्त्वाचे आहे.