वारकरी होऊ -
वारकरी होऊ पंढरीस जाऊ
पाहुनिया विठ्ठला आनंदात न्हाऊ |१|
टाळ चिपळ्यांचा घुमवीत नाद
एकमुखे घालू माऊलीस साद |२|
मालदार कोणी झोळीवाला कोणी
पताका उंचावून विठू एक जाणी |3|
जनी नामा गोरा चोखा रोहिदास
नाही दुजाभाव सर्वामुखी घास |४|
ओळख ना पाळख नका दूर लोटू
जीव लावूनिया पंगतीत भेटू |५|
भेटू एकमेका जाऊ देवळात
संत सज्जनासंगे दंगू कीर्तनात |६|
लोभस मुद्रा कर कटीवर
मूर्ती विठ्ठलाची शांत विटेवर |७|
विठ्ठल विठ्ठल गजर टाळ्यात
चंद्रभागा वाहते माझिया डोळ्यात |८|
विठ्ठल विठ्ठल जप मनीध्यानी
कर्तव्यात लाभ मन समाधा
मिसळपाव
गेल्या आठवड्यात पाहिलेल्या रा-वण मुळे डोक्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला होता त्यामुळेच कि काय? किमान महिनाभर आता कोणताच सिनेमा पहायचा नाही असच ठरवलं होतं, पण गिरिश आणी उमेश कुलकर्णी या जोडीचा देऊळ हा बहुचर्चित सिनेमा प्रदर्शित होतो आहे म्हटल्यावर मला माझा निर्णय बदलावाच लागला.
महाराष्ट्रातलं एक गाव, मंगरूळ!!