Skip to main content

उत्कल दिवस २०१२

लेखक अन्या दातार यांनी रविवार, 29/04/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
आय आय टी खडगपूरमध्ये मला देशाच्या विविध भागातील लोकांचा सहवास मिळाला. त्यांच्या चालीरिती, सण वगैरे जवळून बघायला मिळाले. अर्थात अन्य प्रांतात स्थायिक झालेल्या कुणालाही मिळू शकते. गेल्या महिन्यात मला अजुन एक असाच कार्यक्रम बघायला मिळाला, तो म्हणजे उत्कल दिबस (हो, पूर्व भारतात (बंगाल, ओडिशा, बिहार इ.) व चा उच्चार ब/भ असाच केला जातो) एका रुढार्थाने मागास राज्याचा स्थापना दिवस म्हणजे नक्की असणार तरी काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे; पण या कार्यक्रमाचा आयोजक माझा मित्रच असल्याने थोडेफ़ारतरी भव्य-दिव्य असणार याची कल्पना आधीच मिळाली होती.

पुणे कट्टा: १ मे २०१२

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 28/04/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

मायक्रोव्हेवमधील कैरीचा छुंदा

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/04/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ कप कैरीचा कीस दीड कप साखर (कैरीच्या आबंटपणानुसार कमी-जास्त ठरवावे) १ टेस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून भरडसर जीरेपूड १/२ टीस्पून हळद मीठ चवीनुसार १ टेस्पून पाणी . पाकृ: एका मायक्रोव्हेव सेफ बाऊलमध्ये कैरीचा कीस, मीठ व हळद एकत्र करुन १० मिनिटे बाजूला ठेवावे.

अग्नी-५, लेक टॅपिंग व रिसॅट-१...

लेखक अमितसांगली यांनी शनिवार, 28/04/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात घडलेल्या तीन घटनांनी भारतीयांनी जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतत चाललेल्या भारताला या घटनांनी पुन्हा एकदा भरारीचे पंख मिळाले आहेत. १. अग्नी-५ अग्नी-५ या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे सरंक्षण क्षेत्रात भारतीयांनी जगाला दखल घ्यावयास भाग पाडले. आज पर्यंत भारताच्या सर्व शहरांवर चीन हल्ला करू शकत होता. अग्नी-५ मुळे आता चीनमधील प्रमुख शहरे तसेच संपूर्ण आशिया व आफ्रिकेतील काही भाग आपल्या टप्यात आला आहे. चीनची वाढती महत्वाकांक्षा रोखण्यासाठी व आशियात शांतता निर्माण करण्यासाठी अग्नी-५ ची अत्यंत आवश्यकता होती. २.

माझे ब्रह्मज्ञान

लेखक यकु यांनी शनिवार, 28/04/2012 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
यातल्या प्रत्येक वाक्यावर मी खळखळून हसलो आहे. मानसिक स्वास्थ्‍य बिघडले काय त्याच्या फुकट तपासण्या करणार्‍या लिंक कृपया देऊ नयेत. ;-) म्हणजे हे कष्‍ट वाचवण्यासाठीच. :) एव्हरीथिंग इज ओके. :p ------------------------------------- मी कोण आहे? तुम्ही कोण आहात? हे कोण आहेत, ते कोण आहेत मग परमात्मा कुठे आहे? आपण कोण आहोत? ब्रह्म सत्य आहे. आपण मिथ्‍या आहोत काय? जग हे सत्य आहे. सत्य हे शिव आहे, सुंदर कोण आहे? सत्यम् शिवम् सुंदरम् .. राधामोहन शरणम्. मोहन हा परमात्मा आहे काय? राधा कोण आहे? हे सर्व काय आहे? मग परमात्मा कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? मी कुठे आहे?

राजेश खन्ना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 27/04/2012 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते राजेश खन्ना यांना प्रकृती खराब झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्‍यासोबत पत्‍नी डिंपल कपाडीया रुग्‍णालयता असून तज्‍ज्ञ डॉक्‍टरांचे एक पथक प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्यपणा आणि थकवा जाणवत होता. अखेर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि बातमी आमच्या पिढीला अस्वस्थ करणारी आहे. सुपर स्टार असा किताब मिळवणार हा एकमेव नट.

नो किडिंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 27/04/2012 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी बालगुन्हेगारी, बालगुन्हेगारांची मानसिकता, पालक आणि पाल्य ह्यात वाढत जाणारी दरी ह्या सर्वच विषयांची सांगड घालत काही एक लिखाण करत होतो. ह्या सगळ्यासाठी काही त्या त्या क्षेत्रातील मान्यवर लोकांची मते जाणून घेणे देखील आवश्यक होतेच. अशा काही लोकांना इकडच्या तिकडच्या ओळखी काढून भेटीसाठी जात होतो. अशातच सायबर क्राईम खात्यातील काही मान्यवरांची गाठ घेण्याचे ठरले. अर्थात त्यांच्यापर्यंत पोचणे हे नेहमीप्रमाणे अवघडच होते. अशातच आठवण झाली मिपाकर प्रसन्नदा अर्थात प्रसन्न केसकर ह्यांची. हाडाचा पत्रकार, सर्व थरात ओळखी असणारा हा माणूस सध्या DNA वर्तमानपत्रासाठी काम करत आहे.

एक उनाड दिवस... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 27/04/2012 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
एक उनाड दिवस चल सख्या घालवूया, नको काटे घड्याळाचे राना- वनात फिरूया! एक उनाड दिवस घालू पाखरांना साद, जरा अंगणात त्यांच्या चल रमूया निवांत! एक उनाड दिवस नको पैसा व्यवहार, मन रिक्त होता थोडे येते नात्यांस बहार.. एक उनाड दिवस नको कर्तव्य नि पाश मागे टा़कू कवडसे पाहू मोकळे आकाश!! अश्या उनाड दिवशी भर उन्हात भटकू, मृगजळे दिसताच थोडे फसू, थोडे हसू! पाहू सांज कलंडती रंग जुनेच नव्याने, येवो मन मोहरून मरगळ विझल्याने! असे मनाजोगा वेळ मग हळूच सरावा, चित्त, पुन्हा ताजे होता नवा दिवस गुंफावा! नवा दिवस गुंफावा... -वेणू ब्लॉगः वेणूसाहित्य http://venusahitya.b

( नको देव राया , राज्यसभा पाहू )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 27/04/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :) ------------------------------------------------------------------------------------------------ नको देव राया , राज्यसभा पाहू ! खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे ! विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे ! तूला काय जाहले, अरे देवा ! तुजविण कोण न दिसे संघातुनी ! पळू लागे धोनी, घरीबाई ! निवृतीची आस, दिसते आम्हास ! घेई जहिरात आपुल्या कवेत !! -------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था, जाऊ पाहे हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठाव न
काव्यरस