आमच्या हातात भरपूर वेळ आणि मोफत लेखणी करण्याची पर्वणी आभसी जगतात विनाशुल्क उपलब्ध असल्याने असल्यामुळे आम्ही कोणावरही काहीही खरडू शकतो. असे अनेकांना वाटते ,मलाही वाटते म्हणून ही खरडेगिरी.
सचिन ला देव मानणारे अचानक त्याने खासदारकी स्वीकारली म्हणून दानव समजू लागले आहेत, इंटर नेट वर त्याला शिव्याची लाखोली वाहिली जात आहे.
जणू काही त्याने निशाने पाकिस्तान स्वीकारले आहे असा गजहब करण्यात येत आहे. पूर्वी हा देव मातोश्री वर दर्शन द्यायचा आता कृष्ण कुंज मध्ये त्यांचे बस्तान हलल्यामुळे अपेक्षित त्या प्रतिक्रिया राजकारणी मंडळींकडून आल्या.